Delhi Horror: दिल्लीतील 54 वर्षीय हिंदू महिलेची हत्या; मृतदेह स्मशानभूमीत नेऊन पुरला, 3 आरोपींना अटक

54 वर्षीय महिलेची हत्या केल्याचा आरोप चार जणांवर आहे. रेहान (न्हावी), मोबीन खान (ऑटो रिक्षाचालक) आणि नवीन (शिंपी) आणि सय्यद अली (स्मशानभूमीचा केअरटेकर) अशी त्यांची नावे आहेत.

Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi Horror: दिल्लीत (Delhi) 54 वर्षीय हिंदू महिलेची हत्या (Murder) करून तिचा मृतदेह स्मशानात (Cemetery) दफन केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी पोलिसांनी महिलेचा मृतदेह स्मशानभूमीतून बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार, मीना असे मृत महिलेचे नाव असून तिची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

54 वर्षीय महिलेची हत्या केल्याचा आरोप चार जणांवर आहे. रेहान (न्हावी), मोबीन खान (ऑटो रिक्षाचालक) आणि नवीन (शिंपी) आणि सय्यद अली (स्मशानभूमीचा केअरटेकर) अशी त्यांची नावे आहेत. चौघेही मुस्लिम असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. मीना 2 जानेवारीपासून बेपत्ता असून तिच्या नातेवाईकांनी मंगोलपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. (हेही वाचा - Rajkot Shocker: सावत्र मुलीच्या सततच्या रडण्याला कंटाळला निर्दयी बाप, उचलले टोकाचे पाऊल, आरोपीला अटक)

बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी मीनाचा शोध सुरू केला. दुसरीकडे मीनाच्या कुटुंबीयांना मोबीन खानवर संशय होता. त्याने मीनासोबत गैरकृत्य केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू केला. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून दिल्ली पोलिसांनी मोबीनला ताब्यात घेऊन त्याची कडक चौकशी केली. चौकशीत मोबीनने संपूर्ण हत्येचा खुलासा केला. पोलिसांनी इतर तीन आरोपींना (रेहान, नवीन आणि सय्यद अली) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना फायनान्सचे काम करायची आणि तिन्ही आरोपी मीनाकडेच काम करायचे. तिघांनीही पैशांबाबत काही गैरकृत्य केले होते आणि त्याची माहिती मीनाला समजली होती. ही रक्कम परत करण्यासाठी मीनाने तिघांवरही दबाव टाकला. याच कारणावरून मीनाची हत्या करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement