अनुदान न दिल्यास, दुध दर प्रतिलिटर 5 रुपयांनी महागणार -उत्पादकांची मागणी
मात्र 5 रुपये प्रतिलीटर अनुदान देण्याच्या निर्णय झाला असून ही त्याची रक्कम दिली जात नाही आहे.
दुधाचे दर सातत्याने घसरत असल्याने उत्पादकांनी आंदोलन छेडले होते. मात्र 5 रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याच्या निर्णय झाला असून ही त्याची रक्कम दिली जात नाही आहे. त्यामुळे दुध उत्पादक संतप्त झाले असून या योजनेतून काढता पाय घेण्याची शक्यता आहे.
गुरुवारी उत्पादक आणि प्रक्रिया व्यावयसायिक कल्याणकारी संघाची या दुध दरावरुन बैठक झाली. तर उत्पादकांना दुध दर कमी प्रमाणात मिळत असल्याने तो वाढवून देण्याचा निर्णय जुलैमध्ये राज्य सरकारने दिला होता. मात्र अजूनही ही रक्कम दिली गेली नसल्याचे दुध उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 15 डिसेंबरपूर्वी अनुदान न दिल्यास या योजनेतून बाहेर पडू असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. तर राज्यात गायीच्या दुधाचे दर 17 ते 20 रुपयांनी खाली उतरले होते. मात्र ग्राहकांना 40 ते 42 रुपयांनी विकले जात होते.
त्यामुळे जुलै महिन्यात दुध उत्पादकांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी 5 रुपये अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. मात्र अजून ही दुध उत्पादकांनी दुधाचे दर 5 रुपयांनी वाढवा ही मागणी सातत्याने धरुन ठेवली आहे.