Uttrakhand Accident: लग्नाच्या पार्टीतून परतनाऱ्या बसचा भीषण अपघात, दरीत कोसळल्याने ३० जण दगावले

उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. लग्नाच्या पार्टीतून घरी जाणाऱ्या बसचा अपघात झाला. बस २०० फूट खोल दरीत कोसळली आणि त्यात सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले होते

Photo Credit- X

Uttrakhand Accident: उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. लग्नाच्या पार्टीतून घरी जाणाऱ्या बसचा अपघात झाला. बस २०० फूट खोल दरीत कोसळली आणि त्यात सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. (हेही वाचा- पुण्यात नवरात्रोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते बंद, पार्किंगमध्ये बदल; शहर पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, जाणून घ्या सविस्तर)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बस दरीत कोसळली. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमध्ये ५० हून अधिल लोक प्रवास करत होते. बसमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवाशी हे एका लग्नाच्या पार्टी गेले होते. घरी जाण्यापूर्वीच हा अपघात झाला. बसमधील आणखी काही प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

बस चालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. बस २०० फूट दरीत कोसळल्याने काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथे सर्व जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात हरिद्वार जिल्ह्यातील लालधंग येथील पौडी भागातील बिरोनखल येथे घडली. या घटनेनंतर गावात लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अपघातग्रस्त बसला दरीतून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement