जम्मू-काश्मीर: हंदवाडा येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 3 जवान शहिद तर 7 जण जखमी
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) हंदवाडा (Handwara) येथील दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 3 जवान शहिद झाले असून 7 जवान जखमी झाले आहेत. काझियाबाद परिसराजवळ गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर यांच्यासह 5 जवान शहीद झाले होते.

दरम्यान, गेल्या 36 तासांत 3 दहशतवादी हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कूपवाडा येथील वांगम रफियाबाद येथे CRPF चे 3 जवान दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. या हल्ल्याला भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (हेही वाचा - COVID-19: दिल्लीत सशस्त्र सीमा दलाच्या 8 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)
जम्मू-काश्मीर पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद आणि जम्मू - काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांच्यासह 5 शूर जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले. याची आम्हाला खंत आहे, अशा शब्दांत दिलबाग सिंह यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)