IPL Auction 2025 Live

Hotel Worker Murder in Tamil Nadu: तामिळनाडूतील धर्मापुरी येथे 25 वर्षीय हॉटेल कामगाराची हत्या; आरोपीला अटक

त्यातील दोघांनी आशिकशी बोलण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने चाकू काढला आणि आशिकवर हल्ला केला. आशिकने हल्ल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याला घेरले.

Hotel Worker Murder in Tamil Nadu (PC - X/@vani_mehrotra)

Hotel Worker Murder in Tamil Nadu: तामिळनाडू (Tamil Nadu) तील धर्मापुरी (Dharmapuri) जिल्ह्यात शनिवारी एका 25 वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तीने भोसकून हत्या (Murder) केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आशिक असे या व्यक्तीचे नाव असून तो धर्मपुरीच्या इलाकियामपट्टा भागातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. चार अज्ञात व्यक्तींनी हॉटेलच्या आवारात घुसून त्याच्यावर चाकूने अनेक वेळा हल्ला केला.

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हॉटेलमध्ये शिरताना दिसत आहेत. त्यातील दोघांनी आशिकशी बोलण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने चाकू काढला आणि आशिकवर हल्ला केला. आशिकने हल्ल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्याला घेरले आणि नंतर त्याच्यावर अनेक वार केले. (हेही वाचा -Bengaluru Koramangala PG Murder Video: बिहारमधून बेंगळुरूमध्ये कामासाठी आलेल्या तरुणीची पीजी हॉस्टेलमध्ये निर्घृण हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

पहा व्हिडिओ -

हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना धमकावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आशिकला धर्मपुरी जिल्हा रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (हेही वाचा - Virar Murder Case: विरारमध्ये 60 वर्षीय महिलेची जावयाकडून हत्या; आरोपीला अटक)

या घटनेबाबत बोलताना धर्मपुरी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, आशिकचे एका महिलेसोबत संबंध होते. दोन महिन्यांपूर्वी तो तिच्या आई-वडिलांना लग्न करण्यास सांगण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तथापि, महिलेने आशिकचा प्रस्ताव नाकारला. महिलेच्या भावाने आशिकला धमकी दिली होती. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.