चंदीगड मध्ये एका तरुणीमुळे कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाग्रस्त तरुणी इंग्लडला गेली होती. ती इंग्लडवरून भारतात आली होती. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
चंदीगडमध्ये (Chandigarh) एका कोरोनाग्रस्त (coronavirus) तरुणीमुळे कुटुंबातील तब्बल 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाग्रस्त तरुणी इंग्लडला गेली होती. ती इंग्लडवरून भारतात आली होती. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
या तरुणीच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील 5 जणांनादेखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या तरुणीची आई, भाऊ, मैत्रीण आणि कुकला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या तरुणीच्या संपर्कात आलेली 38 वर्षांच्या महिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्त तरुणीने भारतात आल्यानंतर सलूनमध्ये काम केलं होतं. (वाचा - छत्तीसगड मध्ये 4.2 रिश्टर स्केलचा तीव्रतेचा भूकंप; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात तब्बल 271 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच महाराष्ट्रातदेखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 63 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.