Gujarat Shocker: सेक्स केल्याने योनीतून रक्तस्त्राव, 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू; बॉयफ्रेंड गुगलवरचं शोधत बसला उपचार

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, महिलेच्या योनीमार्गातील ऊती फाटल्या (Vaginal Tissue). त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ही घटना 23 सप्टेंबर रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात घडली.

Gujarat Shocker: सेक्स केल्याने योनीतून रक्तस्त्राव, 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू; बॉयफ्रेंड गुगलवरचं शोधत बसला उपचार
23-year-old dies of vaginal bleeding प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Girlfriend Private Part Bleeding: गुजरात (Gujarat) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरासोबत सेक्स (Sex) केल्यानंतर तिच्या योनीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (Vaginal Bleeding) झाला. या धक्कादायक घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. पीडित तरुणीला रुग्णालयात नेण्याऐवजी प्रियकर रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग ऑनलाइन शोधत राहिला.

फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, महिलेच्या योनीमार्गातील ऊती फाटल्या (Vaginal Tissue). त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ही घटना 23 सप्टेंबर रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात घडली. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर एका हॉटेलमध्ये होते, जिथे सेक्स केल्यानंतर अचानक महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. परंतु, रुग्णवाहिका बोलवण्याऐवजी तरुणीचा प्रियकर रक्तस्त्राव थांबवण्यासासाठी गुगलवर मार्ग शोधत बसला. (हेही वाचा -Mumbai: सेक्स करताना मुंबईतील 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)

रिपोर्टनुसार, प्रियकराने कपड्याच्या साहाय्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. काही वेळाने तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर घाबरलेल्या तरुणाने हॉटेलमध्ये आपल्या एका मित्राला बोलावले. त्यानंतर तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले. (हेही वाचा - Man Dies During Sex: रोमँटिक डिनरनंतर जोडप्याचा सुटला ताबा; सेक्स करताना पुरुषाचा मृत्यू, खिशात सापडली 'ही' गोष्ट)

दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तरुणीला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे, जिथे तिची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलीच्या बॉयफ्रेंडला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2024 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).