Dehli Rape Case: दिल्लीत 20 वर्षीय मुलाचे 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
देशात लैंगिक अत्याचाराच्या (Sexual harassment) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतीच दिल्लीतून (Dehli) एक लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. राजधानीच्या रणजीत नगर (Ranjit Nagar) भागात खेळणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे.
देशात लैंगिक अत्याचाराच्या (Sexual harassment) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतीच दिल्लीतून (Dehli) एक लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. राजधानीच्या रणजीत नगर (Ranjit Nagar) भागात खेळणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. या प्रकरणी 20 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सूरज असे आरोपीचे नाव असून त्याला हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील कलानौर येथून अटक करण्यात आली. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तक्रारीनुसार, आरोपी व्यक्ती, मुलीच्या कुटुंबाचा माजी शेजारी आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपी तिच्याजवळ आला. तिला सांगितले की मी तुला 10 रुपये देतो आणि तिच्यासाठी मिठाई खरेदी करतो.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत सांगितले की, त्याच्या सांगण्यानुसार मुलगी त्याच्या मागे एका रिकाम्या खोलीत गेली. जिथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींबाबत कोणालाच माहिती नव्हती किंवा संशयिताची ओळख किंवा ठावठिकाणाबाबत अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तसेच तपासात 24 तासांत कोणतीही लक्षणीय प्रगती दिसून आली नाही. हेही वाचा Bihar Rape Case: बिहारमध्ये शिकवणी वरून परतत असणाऱ्या 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, गावकऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या हाती केले स्वाधिन
अतिरिक्त पोलिस सहआयुक्त सुमन गोयल यांनी तपासाचे नेतृत्व केले आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर एका संशयिताला पकडण्यात आले. या प्रकरणाचा सखोल आढावा घेण्यात आला. तपासाचे प्रयत्न अधिक तीव्र आणि मजबूत करण्यासाठी जिल्हा व गुन्हे शाखेने घरोघरी जाऊन व्यापक कारवाई केली. संशयिताची घरोघरी चौकशी केली. शेवटी त्याची ओळख पटली. रात्री उशिरा केलेल्या कारवाईत त्याचा माग काढण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2021 07:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

