Bihar Shocker: मसौरीमध्ये एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या, आरोपी फरार; घटनेचा व्हिडिओ आला समोर

एका सनकी प्रियकराने एका 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना बिहार येथील पाटणा शहरात घडली.

Representational image (Photo Credit- IANS)

बिहारमध्ये गेल्या काही काळात गुन्हेगारीची साखळी वाढत आहे. दरम्यान एका सनकी प्रियकराने एका 17 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना बिहार येथील पाटणा शहरात घडली. भरदिवसा विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हे हत्या प्रकरण जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं होत. यामध्ये मुलीची चूक नसताना देखील तीला तिचे प्राण गमवावे लागले. या खळबळजनक घटनेमुळे शहर हादरलं आहे.

पाठलाग करत गोळी झाडली

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनामिका कुमारी असं मृत तरुणीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी अनामिका क्लाससाठी घरातून निघाली. दरम्यान मसौरी येथील एका सूनसान जागेवर येताच सनकी प्रियकराने तिचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर तिच्यावर हल्ला होतो. तिचे लक्षात येताच  पळण्याच्या प्रयत्न केला. आरोपीने बंदुक काढून तिच्या डोळ्यात गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात ती जमीनीवर पडली. त्यानंतर लगेच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही घटना घडताच जमाव जमला. या घटनेची माहिती मसौरी पोलिसांना देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी पोहचून अनामिकाला रुग्णालाय नेलं. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या ह्रदयद्रावक घटनेची माहिती मृत तरुणीच्या आई वडिलांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा स्कॅन करत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि आरोपी एकाच क्लास मध्ये शिकत होते. गेले अनेक दिवसांपासून आरोपीने तरुणाला प्रेमासाठी विचारणा केली होती. तरुणीने अनेकदा नकार दिल्याने आरोपीला या गोष्टीचा रागा आला आणि त्याने तरुणीची हत्या केली.

आईकडून कडक कारवाईची विनंती

आरोपीला कडक कारवाई करा अशी विनंती मृत तरूणीच्या आईने केली आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात येईल अशी माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement