Coronavirus: इंदोर मध्ये 17 नवे कोरोना रुग्ण; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 66

त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 66 वर पोहचली आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारतात (India) कोरोना ग्रस्तांचा आकडा 1200 हून अधिक झाला आहे. तर 100 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 40 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

Coronavirus: इंदोरमध्ये (Indore) आज 17 नवे कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 66 वर पोहचली आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारतात (India) कोरोना ग्रस्तांचा आकडा 1200 हून अधिक झाला आहे. तर 100 हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 40 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज केरळमध्ये एका 68 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मुंबई, पुणे शहरामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज मुंबईत 4, पुण्यात 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 230 पर्यंत पोहचला आहे. (हेही वाचा - मुंबई मध्ये 4 तर पुणे शहरात 1 नवा कोरोनाबाधित; महाराष्ट्रात Covid 19 पॉझिटिव्ह असणार्‍यांची संख्या 230 ; 30 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

कोरोनाने अमेरिका, इटली, स्पेनसह इतर युरोपियन देशालाही विळखा घातला आहे. या देशांमधील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या देशांत आतापर्यंत कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 37 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाख 84 हजारांपर्यंत पोहोचली आहे.