दिल्लीत आज 3,797 नवे कोरोना रुग्ण, तर 99 जणांचा मृत्यू ; 16 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

दरम्यान, कोरोना विषाणू, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

17 Nov, 05:01 (IST)

दिल्लीत आज 3,797 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

17 Nov, 04:35 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 186 रुग्ण आढळले  आहेत.

17 Nov, 04:13 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 3797 रुग्ण आढळले असून 99 जणांचा बळी गेला आहे.

17 Nov, 03:56 (IST)

अभिनेता सोनू सूद यांना निवडणूक आयोगाने पंजाबचा राज्य प्रतीक म्हणून नियुक्त केले.

 

17 Nov, 03:47 (IST)

हिमाचल प्रदेशमध्ये आज 443 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

17 Nov, 03:13 (IST)

हिमाचल प्रदेश: किन्नौर जिल्ह्यात आज हिमवृष्टी झाली.

 

17 Nov, 03:08 (IST)

औरंगाबाद जिल्ह्यात आज 82 जणांना  सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 39987 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 65 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41662 झाली आहे.

17 Nov, 02:36 (IST)

पंजाबमध्ये आज 445 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 570 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

17 Nov, 02:03 (IST)

नेपाळ: काठमांडूतील लोकांनी आज भाऊबीजेचा सण साजरा केला आहे.

17 Nov, 01:46 (IST)

कर्नाटक: बंगळुरुच्या एचएसआर लेआऊट येथील पबमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

17 Nov, 01:31 (IST)

मुंबईमध्ये आज 409 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 529 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

17 Nov, 01:16 (IST)

तामिळनाडू: मदुराईच्या काही भागात आज पावसाने जोर धरला आहे.

 

17 Nov, 24:58 (IST)

जम्मू-कश्मीर: पाकिस्तानने आज संध्याकाळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचं उल्लंघन केले.  भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत आहे.

17 Nov, 24:29 (IST)

सुशील मोदी नाराज नाहीत, त्याच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाईल, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


 

17 Nov, 24:12 (IST)

महाराष्ट्रात आज 2535 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 3001 जणांची कोरोनावर मात केली आहे. याशिवाय 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

16 Nov, 23:35 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी BRICS च्या प्रभावी गटांच्या वर्चुअल शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

16 Nov, 23:04 (IST)

उत्तराखंडचे सीएम त्रिवेंद्रसिंग रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गौचर येथे पोहोचले आहेत.

 

16 Nov, 22:10 (IST)

नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ट्वीट-

 

16 Nov, 21:29 (IST)

केरळ सीएमओचे माजी प्रधान सचिव एम. शिवसंकर यांची चौकशी करण्यासाठी सीमाशुल्क विभागाचे अधिकारी एर्नाकुलम जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे. ट्वीट-

 

16 Nov, 20:59 (IST)

टीव्ही मीडियाची स्वतःची स्वयं-नियामक संस्था असावी. न्यायमूर्ती ए.के. सिक्री यांच्या अध्यक्षतेखाली एक एजन्सी न्यूज चॅनेल्सचे नियमन करण्यासाठी बनविण्यात आली आहे पण त्यातील बरेचसे सदस्य नाहीत. आचारसंहितेची धारणा असलेल्या प्रसारमाध्यमांना जबाबदार धरावे यासाठी सूचना आल्या आहेत अशी माहिती केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

Read more


राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार, 16 नोव्हेंबर) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. तर, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. राज्यात रविवारी 3 हजार 65 जणांनी करोनावर मात केली असून, 2 हजार 544 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर 60 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 92.45 वर पोहचला आहे.

बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. या पीडितेचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, कोरोना विषाणू, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now