Haryana Shocker: 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार,तिघांवर गुन्हा दाखल

हरियाणात एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Haryana Shocker: हरियाणात एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका केले आहेत आणि आरोपींना अटक करण्यात आले आहे. ही घटना हरियाणा राज्यातील जिंद मध्ये घडली आहे. मुलची राहत्या गावातूनच अपहरण करण्यात आले होते. हेही वाचा- भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 20 दिवसांपासून बेपत्ता होती, त्यानंतर तिच्या वडिलांनी तक्रार केली. पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांनी पीडित मुलाला शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. तपासादरम्यान तीन आरोपींची नावे समोर आली आहे. त्यापैकी एक आरोपी ही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे आणि दोन जण तीच्याच गावातील रहिवासी आहे.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केले आणि पीडित मुलीची सुटका केली.अपहरण करून मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींवर पोस्को कायद्यांअतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अपहरण आणि बलात्कारासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ माजली होती.