बीड येथील घटनेवरून निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; 15 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.
बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे म्हणाले आहेत. ट्वीट-
बीड जिल्ह्यात नेकनूर भागात 13 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने एका महिलेवर अॅसिड फेकून, पेट्रोलचा वापर करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात द्रुतगती न्यायालयात खटला चालवावा, जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख वैयक्तिकरित्या लक्ष घालत आहेत.
आसाममध्ये आज कोरोना विषाणूच्या 93 रुग्णांची नोंद झाली असून आज 389 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2,10,268 झाली असून, यामध्ये 2,05,636 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि यामध्ये 963 मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यात सक्रिय प्रकरणे 3666 आहेत.
पुडुचेरीचे उपराज्यपाल चंद्रवती यांच्या आज चरखी दादरी जिल्ह्यातील डळवास येथील त्यांच्या गावी संपूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले. त्यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी रोहतकच्या पीजीआयएमएस रुग्णालयात निधन झाले. ट्विट-
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी शिमला येथे सहलीला गेले होते, असा आरोप राजद नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे. ट्विट
सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, बागपत, आग्रा, अलिगड, हाथरस, एटा, कासगंज, संभाल, बदायूं, बरेली, फिरोजाबाद, इटावा, मैनपुरी, कन्नौज, फर्रुखाबाद, लखीमपुर खेरी, औरैया जिल्हा येथे पुढील 3 तासांपर्यंत (रात्री 11:40 वाजेपर्यंत) मुसळधार पाऊस/वादळ होण्याची शक्यता आहे. IMD ने याबाबत माहिती दिली.
अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील Helmand आणि Kandahar प्रांतांमध्ये सुरक्षा दलांशी नुकत्याच झालेल्या चकमकींमध्ये 60 हून अधिक तालिबानी कमांडर्सचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
दिल्लीत RT-PCR चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाचे मोबाइल चाचणी व्हॅन असुरक्षित ठिकाणी तैनात करण्यात येतील. कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी काही एमव्हीडी रुग्णालये कोविड समर्पित रुग्णालयात रूपांतरित केली जातील. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 2,544 रुग्णांची आणि 60 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 3,065 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 84,918 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 16,15,379 रुग्ण बरे झाले असून, 45,974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालः कोलकाताच्या रवींद्र सदन येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिनेता सौमित्र चटर्जी यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. सौमित्र चटर्जी यांचे आज कोलकाता येथे निधन झाले.
उर्फान मुल्ला यांनी दिला गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक अध्यक्ष व स्पॉक्स पदाचा राजीनामा. पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, 'कॉंग्रेसकडे संघटना, दिशा आणि नेतृत्व नाही. गोव्यातील पक्षातील जेष्ठ नेते निर्णय घेण्यास फारच अपयशी ठरले आहेत.'
दिवाळी च्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळाच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थांची उपलब्धता आहे. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई-फराळ मिळत असल्याबाबत, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: केली तपासणी केली. यावेळी त्यांनी नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले.
जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांना गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पटेल यांची कोरोना व्हायरस चाचणी काही दिवसांपूर्वी पॉजिटीव्ह आली आहे. (सविस्तर वाचा)
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्वत: रोहिणी खडसे यांनीच दिली आहे.
अभिनेते सौमित्र चटर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चटर्जी यांनी आपल्या कामातून बंगाली संवेदनशीलता, भावना आणि संस्कार यांना मूर्त रुप दिले.
राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उद्यापासून (सोमवार, 26 नोव्हेंबर) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे राज्यभरातील 'भक्त' मंडळींच्या आनंदाला उधान आले आहे. मात्र, मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी नियम आणि अटींचे पालन काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता भक्तांना घ्यावी लागणार आहे. मंदिरात जाताना कोणत्याही स्थितीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोणत्या नियमांचे पालन करायचे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवाहन केले आहे. या अवाहनात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा. गाभाऱ्यात, प्रार्थनास्थलात जाताना गर्दी टाळा. शिस्तपालन आवश्यक, मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या काळात विवाहांवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयं बंद आहेत. अशा वेळी नागरिक रिसार्टला मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसत आहेत. काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत रिसॉर्टवर विवाह सोहळा आयोजित करणयाचा ट्रेण्ड वाढताना दिसतो आहे. त्यामुळे रिसॉर्ट व्यावसायिकांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मंगल कार्यालय व्यावसायिकांचे उत्पादन मात्र बरेचसे घटत असल्याचे पाहायाल मिळत आहे.
कोरोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अवघे जग ठप्प झाले. अशा वेळी घरी थांबून करायचे काय असा सवाल अनेकांच्या पुढे निर्माण झाला होता. अशा स्थितीत अनेकांनी ऑनलाईन वेबसीरिज, चित्रपट, मालिका पाहण्यााला प्राधान्य दिले. तर काहींनी वाचनाद्वारे आपला व्यासंघ वाढविण्याचा प्रयत्न केला. व्यासंघ वाढविणाऱ्यांचा टक्का लॉकडाऊन काळात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ग्रंथविक्री आणि ग्रंथखरेदी यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यात दिवाळी अंकांचाही समावेश आहे. दिवाळी आणि लॉकडाऊन काळात ग्रंथविक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे प्रकाशक आवर्जून सांगतात.
दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)