टीव्हीचा रिमोट भावाने नाही दिला, बहिणीची आत्महत्या

टीव्ही रिमोटवरुन भावा बहिणीमध्ये झालेल्या वादावरुन चक्क 12 वर्षीय बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आत्महत्या (फोटो सौजन्य- Pixabay, Open Clip Art)

टीव्ही रिमोटवरुन भावा बहिणीमध्ये झालेल्या वादावरुन चक्क 12 वर्षीय बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या प्रकरणी बहिणाचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीमधील सीलमपुर येथे एका घरात दोन भावंडासह 12 वर्षीय बहिण टीव्ही पाहत होती. तर थोड्यावेळात या बहिणीचा आवडता शो लगणार होता त्यामुळे ती भावाकडे रिमोट मागू लागली. परंतु भावाने रिमोट देण्यास नकार दिल्याने तिला खूप राग येऊन त्यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर बहिणीने स्वत:ला पालकांचा खोलीत बंद करुन घेतले. तसेच भावाने तिला प्रतिउत्तर देण्यासाठी तो खोलीचे दार जोरजोराने वाजवू लागला. मात्र मुलीने दार उघडत नसल्याने त्या 7 वर्षाच्या भावाने त्याच्या मोठ्या भावाला बोलावून या प्रकरणाबद्दल सांगितले.

या दोघांनी मोठ्या शर्थीने खोलीचे दार तोडले त्यावेळी बहिणीने पंख्याला गळफास लावून घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेने तिच्या घरातील मंडळींना धक्का बसला. त्वरीत या घरातील मंडळींनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराच्या तीन दिवसांनी या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif