Agra Shocker: लैंगिक संबंध नकारल्याने शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर केला प्रसारित, चार विद्यार्थ्यांना अटक
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ बनवून चार विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केले आहे. पीडित शिक्षक मथुरा येथील शाळेत शिक्षक आहे
Agra Shocker: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ बनवून चार विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केले आहे. पीडित शिक्षक मथुरा येथील शाळेत शिक्षक आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा व्हिडिओ आणि फोटो फोनमध्ये कैद केले. (हेही वाचा- वर्सोवा मध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरूणाकडून रिक्षातील प्रवासी महिलेसोबत गैरवर्तन, मोबाईल ही हिसकावला; पोलिसांनी 12 तासांत लावला आरोपींचा छडा)
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी शिक्षकासोबत जवळी साधली. त्यानंतर तीच्या सोबत चॅट करू लागले. काही दिवसांनतर विद्यार्थ्याने चोरून शिक्षकाचा नग्न व्हिडिओ आणि फोटो आपल्या फोनमध्ये काढले. याच गोष्टीचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला शारिरिक संबंध ठेवण्यास धमकी दिली.
त्यातील एका मित्राने शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ व्हॉयअॅप आणि इन्स्टाग्रामवर प्रसारित शेअर केला. या घटनेला वैतागून शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु मिशन शक्ती अभियान केंद्राकडे मदत मागितली. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांविरुध्दात गुन्हा दाखल केला. आरोपी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सर्व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरून शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ हटवला. या घटनेनंतर शिक्षक नैराश्यात आहे. पोलिसांनी शिक्षकाला आवाहन केले की, दोषीवर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे.