Zee marathi awards 2018 : पहा झी मराठीकडून गौरविण्यात आलेल्या कलाकारांची संपूर्ण यादी

तमाम मराठी प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली झी मराठी वाहिनी, दर्जेदार मालीकांसह विविधांगी कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते

Zee marathi awards 2018 : पहा झी मराठीकडून गौरविण्यात आलेल्या कलाकारांची संपूर्ण यादी
तुला पाहते रे (Photo credit : www.zeemarathi.com)

तमाम मराठी प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली झी मराठी वाहिनी, दर्जेदार मालीकांसह विविधांगी कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय दिमाखाने पार पडणाऱ्या या कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांनाच असते.

कलाकारांच्या परफॉर्मन्ससोबत, विनोदी स्कीट याचसोबत संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला एकत्र पाहण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे मिळते. सध्या लागीर झालं जी, माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, स्वराज्य रक्षक संभाजी, होम मिनिस्टर, तुला पाहते रे अशा अनेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकांमध्ये चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत प्रेक्षकांनी भरभरून मत दिलेले त्यांचे लाडके कलाकार ‘सर्वोत्कृष्ट’ होऊन विजयी ठरले आहेत. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला. चला तर पाहूया प्रेक्षकांनी ‘सर्वोत्कृष्ट’ म्हणून कोणा कोणाची निवड केली आहे.

झी मराठी अवॉर्ड्स 2018च्या विजेत्यांची नावे -

सर्वोत्कृष्ट मालिका - तुला पाहते रे

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - चला हवा येऊ द्या

सर्वोत्कृष्ट नायिका - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट नायक - विक्रांत सरंजामे (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट जोडी - राणा-अंजली (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) - ईशाचे वडील (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) - राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) - बरकत  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) - रेवती (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट भावंडं - राणा-सुरज (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सून - अंजली  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट सासू - राधिकाची सासू (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट सासरे - राधिकाचे सासरे (माझ्या नवऱ्याची बायको)

सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा - राहुल्या (लागीरं झालं जी)

सर्वोत्कृष्ट आई - ईशाची आई (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट वडील - ईशाचे बाबा (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट कुटुंब - निमकर कुटुंब (तुला पाहते रे)

सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक - संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये)

सर्वोत्कृष्ट खलनायिका - नंदिता (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट खलनायक - हर्षवर्धन (लागीरं झालं जी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार - लाडू  (तुझ्यात जीव रंगला)

सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - तुला पाहते रे

याच सोबत या सोहळ्यात झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिकांना श्रवणीय आणि अजरामर शीर्षकगीते देणाऱ्या संगीतकार अशोक पत्की यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2018 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).