बायोकाच्या आरोपानंतर Yo Yo Honey Singh याचे स्पष्टीकरण, म्हटले- त्रासात असून कायद्यावर आहे विश्वास
कारण त्याची पत्नी शालिनी सिंह हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. त्याच्या पत्नीने परिवारावर सुद्धा गंभीर आरोप लावले आहेत.
बॉलिवूड रॅपर हनी सिंह (Honey Singh( सध्या चर्चेत आहे. कारण त्याची पत्नी शालिनी सिंह हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आहे. त्याच्या पत्नीने परिवारावर सुद्धा गंभीर आरोप लावले आहेत. तरीही हनी सिंह याने या मुद्द्यावरुन कोणतेही विधान केले नव्हते. मात्र आता त्याने मौन सोडत यावरील स्पष्टीकरण दिले आहे. हनी सिंह याने स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.(Honey Singh च्या पत्नीचे सासऱ्यांवर गंभीर आरोप- 'मी कपडे बदलत असताना ते खोलीत शिरले व त्यांनी माझ्या स्तनांवरून हात फिरवला')
हनी सिंह याने इंस्टाग्रामवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे लिहिण्यात आले आहे की, माझी बायको शालिनी सिंह हिने माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मी दु:खी झालो आहे. हे सर्व आरोप खोटे आहेत. मी आधी सुद्धा कधीच कोणतेही सार्वजनिक विधान जाहीर केले नाही. माझ्या लिरिक्सवर टीका करण्यात आली होती. जेव्हा माझ्या आरोग्यबद्दल विविझ गोष्टी केल्या होत्या. ऐवढेच नव्हे तर मीडिया सुद्धा निगेटिव्ह गोष्टी माझ्याबद्दल दाखवत होते तरीही मी काही बोललो नाही. मात्र आता मी यावर मौन सोडले आहे. कारण हे आरोप माझ्या परिवारावर लावण्यात आले आहेत. ही लोक माझ्या कठीण काळात माझ्यासोबत होते. त्यामुळे हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.
मी 15 वर्ष या इंडस्ट्रीशी जोडला गेलो आहे. मी काही आर्टिस्ट्स आणि म्युजिशियनसोबत काम केले आहे. सर्वांनाच माहिती आहे की, माझे बायकोसोबतचे संबंध कसे आहेत. त्यामुळे मी हे सर्व आरोप फेटाळून लावत आहे. यावर मी अधिक काही बोलू शकत नाही. कारण हे प्रकरण आता कोर्टापर्यंत गेले आहे. मला देशाच्या कायद्यावर पूर्णपणे भरोसा आहे. मला विश्वास आहे की, सत्य लवकरच समोर येईल.
या दरम्यान मी सर्व चाहते आणि ओळखीच्या लोकांना सांगू इच्छितो की, सत्य माहिती नसेल तर त्याच्या विविध निष्कर्षापर्यंत पोहचू नका. खासकरुन जो पर्यंत कोर्टाकडून काही निर्णय येत नाही. मला विश्वास आहे सत्याचाच विजय होईल. नेहमीप्रमाणे मला साथ देण्यासह पाठिंबा दिल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो.