मालिका-चित्रपटाच्या नियमात काही बदल करुन शूटिंगला सुरुवात; 60 वर्षांवरील कलाकार आणि लहान मुलांना सेटवर बंदी कायम
लॉकडाऊनचा फटका मनोरंजन सृष्टीला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे बंद झालेले चित्रीकरण आता हळूहळू सुरु होत आहे. नव्या अटींनुसार, चित्रीकरणाच्या सेटवर रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स नसले तरी चालणार आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे गेले 3 महिने मालिका आणि चित्रपटाचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहेत. अनलॉक-1 सुरु झाल्यानंतर काही नियम-अटी घालून चित्रिकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात ज्येष्ठ कलाकार आणि लहान मुलांना सेटवर बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. निर्मात्यांच्या संस्थेने, चित्रपट महामंडळाने ज्येष्ठ कलाकारांना सेटवर येऊ देण्याची परवानगी मागितली होती. मात्र नव्या अध्यादेशातही ही मागणी अमान्य झाली आहे
लॉकडाऊनचा फटका मनोरंजन सृष्टीला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे बंद झालेले चित्रीकरण आता हळूहळू सुरु होत आहे. नव्या अटींनुसार, चित्रीकरणाच्या सेटवर रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स नसले तरी चालणार आहे. पण त्याचवेळी सेटवर रुग्णाला नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाणारी एक गाडी तयार असणं अत्यावश्यक आहे. शिवाय त्या गाडीत प्रथमोपचार करण्याच्या सुविधा असणं बंधनकारक असणार आहे. साताऱ्यामध्ये झी मराठीच्या 'मिसेस मुख्यमंत्री’ व ‘टोटल हुबलाक’ मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात; लवकरच पाहायला मिळणार नवीन एपिसोड्स
मात्र नव्या अध्यादेशात 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar), अशोक सराफ (Ashok Saraf) आदि ज्येष्ठ कलाकारांसोबत 65 वर्षांवरील तंत्रज्ञ, दिग्दर्शक यांना देखील सेटवर मज्जाव घालण्यात आला आहे. यात डेविड धवन (David Dhawan), महेश भट (Mahesh Bhatt), सुभाष घई (Subhash Ghai), जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये झी मराठीच्या (Zee Marathi) 'मिसेस मुख्यमंत्री’ (Mrs. Mukhyamantri) व ‘टोटल हुबलाक’ (Total Hublak) मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना नवीन एपिसोड्स पाहायला मिळतील. सातारा (Satara) जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)