National Film Awards 2023: मीमीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती सेननने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात,चाहत्यांसोबत मंदिरा बाहेर गप्पा

तीचे सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे.

kriti senon

National Film Awards 2023: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननने  मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे.  निर्मात्यांनी आणि चाहत्यांनी या चित्रपटा बदद्ल कौतुक केले. त्या सर्वांचे आभार मानल्यानंतर क्रिती शनिवारी मुंबईतील दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आली.  मंदिराच्या बाहेर तिनं चाहत्यांशी संवाद साधला. किर्तीने पिवळा रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. किर्ती आई आणि बहिन नुपुर सोबत गणपती मंदिरात आली आहे.

गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर, अभिनेत्री बाहेर उपस्थित असलेल्या चाहत्यांमध्ये प्रसाद वाटप करताना दिसली, चाहत्यांनी यशाबद्दल तिचे खुप अभिनंदन केले. मंदिराबाहेर हिंडणाऱ्या मुलांमध्येही तिने मिठाईचे वाटप केले. पोलीसांचा बंदोबस्त देखील करण्यात आला होता. तिच्या या यशानंतर चाहते खुप खुश आहेत. कलाकार मंडळीनी देखील तीला शुभेच्छा दिल्या आहेत.

किर्तीला मीमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे, तिने तिच्या Instagram वर एक पोस्ट लिहिली, तिच्या सर्व जवळच्या आणि प्रियजनांचे आणि तिच्या चाहत्यांना त्यांच्या  पाठिंब्या दिल्याबद्दल धन्यवाद दिली आहे. तिने तिच्या आई आणि वडिलांसोबत मिठी मारून तिच्यासोबत आनंद साजरा करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. कृती टायगर श्रॉफसोबत गणपतमध्ये दिसणार आहे. काजोलसोबत तिचा डेब्यू प्रोडक्शन 'दो पट्टी' देखील आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif