विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा 'हा' फोटो पाहून Netizens ना फुटले हसू, म्हणाले- 'शो पेक्षा फोटोवर चर्चा'

अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोत ती कॅमेर्‍याकडे पाहून हसत आहे आणि 'पाताल लोक' वेब सिरीज टीव्हीवर चालू आहे आणि टीव्हीच्या खाली एक फोटो फ्रेम ठेवली आहे, जी विराट-अनुष्काच्या लग्नाचे स्केच आहे.

अनुष्का शर्मा (Photo Credit: Twitter)

लॉकडाउनमध्ये खेळाडूंना आपल्या कुटुंबाला दर्जेदार वेळ द्यायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharm) एकत्र वेळ घालवत आहेत. लॉकडाउनमध्ये, अ‍ॅमेझॉन प्राइमवर 'पाताल लोक' (Patal Lok) नावाची एक नवीन वेब सीरिज रिलीज झाली आहे. अनुष्का शर्माच्या प्रोडक्शनमध्ये बनलेल्या यावेब सीरिज रिलीजला यूजर्सकडून खूप पसंती दिली जात आहे. ही वेब मालिका 15 मे रोजी रिलीज झाली आहे. रात्री 'पाताल लोक' पाहताना अनुष्काने तिचा एक फोटो पोस्ट केला होता, तिथे एक फोटो पाहून यूजर्सना हसू फुटले. अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोत ती कॅमेर्‍याकडे पाहून हसत आहे आणि 'पाताल लोक' वेब सिरीज टीव्हीवर चालू आहे आणि टीव्हीच्या खाली एक फोटो फ्रेम ठेवली आहे, जी विराट-अनुष्काच्या लग्नाचे स्केच आहे. (विराट कोहली की रवींद्र जडेजा? सर्वोत्कृष्ट फील्डर वादावर टीम इंडिया कर्णधाराच्या प्रतिक्रियेने जिंकली Netizens ची मनं)

स्केचमध्ये विराट-अनुष्काचे हसरे चेहरे बनवण्यात आले आहेत. दोन्ही बाजूला दोन नर व मादी सुपरहीरो पुतळे देखील ठेवलेले आहेत. काही लोकांनी फोटो फ्रेमचे कौतुक केले तर काहींना हसू अनावर झाले. अनुष्काने तिच्या लिविंग रूममधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले,"आता प्रत्येकजण #PaatalLok पहात आहे. @Primevideoin वर स्ट्रीम होत आहे.” पाहा विराट-अनुष्काचा हा फोटो:

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: 

फोटो

हे कोणी काढले...

पोर्ट्रेट

छान

शो पेक्षा फोटोवर चर्चा

11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमधील एका खासगी सोहळ्यात अनुष्का आणि विराट विवाहबंधनात अडकले. लॉकडाउनमुळे विराट त्याच्या घरी असून कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्याने अनुष्कासमवेत घरी 'पाताल लोक' वेब सीरिज पाहिली. अनुष्का देखील बर्‍याच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती अखेरीस 'झिरो' चित्रपटात झळकली होती जो 2018 मध्ये आला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif