टीव्ही शो 'तारक मेहता... मध्ये परत येणार नाही तुमची लाडकी दयाबेन, ही अभिनेत्री घेणार तिची जागा
आता निर्मात्यांनी नव्या दयाबेन चा शोध घेतला आहे. आता विभूति शर्मा (Vibhuti Sharma) दयाबेनची भूमिका साकारणार आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे.
सब टीव्हीचा टीव्ही शो 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Oolta Chashma) याच्या लोकप्रियतेमध्ये दयाबेन उर्फ दिशा वकानी (Disha Vakani) हिचा फार मोठा हात आहे. मात्र आता दिशा कौटुंबिक जबाबदारीमध्ये गुरफटल्यामुळे तिने हा शोला राम राम केला आहे. त्यानंतर इतके दिवस तिची मनधरणी करूनही दिशा परत येण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता निर्मात्यांनी नव्या दयाबेन चा शोध घेतला आहे. आता विभूति शर्मा (Vibhuti Sharma) दयाबेनची भूमिका साकारणार आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे.
दर दिशाची गेली दोन वर्षे गरोदरपणाची सुट्टी चालू आहे, त्यानंतर ती गेले काही महिने सेटवर आलीच नाही. शोमध्ये परत येण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. निर्मात्यांनी काही अटी मान्य केल्या आहेत, मात्र सर्व अटी ते मान्य करू शकले नाहीत. दिशाने शोमध्ये परत यावे म्हणून निर्मात्यांसह तिच्या चाहत्यांनीही विनंती केली होती. तरी दिशाने नकार दिल्याने नवी दयाबेन लवकरच पेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी विभूति शर्मा हिचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. (हेही वाचा: क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर युवराज सिंह चे छोट्या पडद्यावर पदार्पण? 'या' दोन मोठ्या शोसाठी झाली विचारणा)
दरम्यान, दिशाचे पती मयूर पढिया यांनी निर्मात्यांसमोर दोन अटी ठेवल्या होत्या, दिशा केवळ 4 तास आणि महिन्यात केल्वळ 15 दिवस काम करेल. मात्र निर्मात्यांनी ही मागणी मंजूर केली नाही. मात्र दिशा वकानी आपल्या भूमिकेमुळे चाहत्यांचे मन जिंकले होते, आता विभूती कशा प्रकारे ही भूमिका साकारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.