लग्नाची वाईफ वेडींगची बायकू मालिकेतली 'इंग्लंडची राणी' आहे तरी कोण? पाहा हे खास फोटो
Laganchi Wife Weddingchi Baykoo Fame Leeana Aanand (Photo Credits : Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील नवी मालिका लग्नाची वाईफ वेडींगची बायकू (Lagnachi Wife Weddingchi Baykoo) ही अवघ्या काहीच दिवसात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. वास्तविक  एक नवरा दोन बायका हा मालिकेचा विषय, यापूर्वी सुद्धा अनेकदा अन्य मालिका, चित्रपट यांच्यातून समोर आला आहे  तरी, अस्सल ग्रामीण अंदाज आणि नवोदित कलाकारांमुळे मालिका चर्चेचा विषय ठरत आहे.  याचाच एक भाग म्हणजे मालिकेमधील 'इंग्लंडची राणी', किंवा 'विदेशी डॉल' मारिया. जर का तुम्ही या मालिकेचे प्रोमो किंवा आतापर्यंतचे भाग बघितले असतील तर तुम्हाला सुद्धा ही विदेशी पाहुणी नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न पडलाच असेल.. हो ना? याच उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत, झी च्या या नव्या मालिकेत विदेशी ललना साकारणारी ही अभिनेत्री आहे लियाना आनंद (Leeana Aanand).

लियाना आनंद ही लग्नाची वाईफ वेडींगची बायकू या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली आहे. या पहिल्याच प्रोजेक्त मध्ये तिने आपला ग्लॅमरस अंदाज आणि बोलण्यातील विदेशी लकबीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लियाना ही काही दिवसांआधी झी मराठी अवॉर्ड्सच्या सोहळ्यात सुद्धा दिसून आली होती.

पाहा लियानाचे काही खास फोटो

अग्गंबाई..सासूबाई या मालिकेमधील मधील 'मॅडी' आहे हिंदी आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची बायको

 

View this post on Instagram

 

Come With me🤗 Come to me🤗💫🥂🖤

A post shared by LeeAana Anand🖤🥂💫 (@leeaana1001) on

#Video: रात्रीस खेळ चाले 2 च्या सेटवर शेवंता बनवतेय चिकन; पहा संजय जाधव व टीम सोबतचे धम्माल Photo

 

View this post on Instagram

 

How long can you wait ? 💫🖤🥂

A post shared by LeeAana Anand🖤🥂💫 (@leeaana1001) on

दरम्यान, या मालिकेमध्ये विजय आंदळकर याने मुख्य अभिनेत्याची म्हणजेच मदनची भूमिका साकारली आहे. हिंगणगाव चा मदन त्याची गावरान ठसक्यासारखी बायको आणि त्यात ही लंडनची पाहुणी असा सगळा सावळा गोंधळ मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे.