अग्गंबाई..सासूबाई या मालिकेमधील मधील 'मॅडी' आहे हिंदी आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
Bhakti Ratnaparkhi (Photo Credits: Instagram)

कमी कालावधीत लोकप्रिय झालेली झी मराठीवरील अग्गंबाई... सासूबाई (Aggabai Sasubai) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यात आसावरी आणि अभिजीत राजे ही पात्रं जितकी प्रेक्षकांना आवडत आहे तितकीच या मालिकेमधील 'मॅडी' हे पात्राने प्रेक्षकांना हसून हसून वेडं लावलय. अभिजीत राजे यांचे असिस्टंट म्हणजेच डॉ. गिरीश ओक (Dr. Girish Oak) यांची असिस्टंट हे पात्र जिने साकारले आहे तिचे नाव आहे भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi). या मालिकेत भक्तीने एक विनोदी भूमिका केली. निरागस, प्रेमळ, वेंधळट असं हे पात्र सध्या प्रेक्षक खूप पसंत करत आहेत.

भक्ती रत्नपारखी हिचे आडनाव तुम्ही याआधी सिनेसृष्टीत याआधी ऐकल्याचे आठवत असेल. कारण भक्ती ही मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम करणा-या प्रसिद्ध अभिनेता निखील रत्नपारखी (Nikhil Ratnaparkhi) याची पत्नी आहे. निखील रत्नपारखी यांनी मराठीतील नारबाची वाडी (Narbachi Wadi), व्हेंटिलेटर (Ventilator), काय रे रास्कला (Kay re Rascala) या मराठी चित्रपटांसोबत ओ माय गॉड (Oh!My God), द डार्क साइड ऑफ लाईफ इन मुंबई (The Dark Side Of Life: Mumbai), चीनी कम (Cheeni Kum), पहेली (Paheli) या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Nikhil and Bhakti Ratnaparkhi (photo Credits: Instagram)

तर भक्ती रत्नपारखी म्हणजेच सध्याची सर्वांची लाडकी मॅडी ही या आधी कॉमेडीची बुलेट ट्रेन या शो मध्ये दिसली होती. तसेच तिने ही ब-याच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ओ माय गॉड, सी कंपनी या हिंदी चित्रपटांसह देऊळ (Deool) या मराठी सिनेमातही काम केले आहे. मात्र तिचे छाप पाडणारे पात्र अग्गंबाई....सासूबाईमधलं मॅडी पात्र ठरलं.  हेही वाचा- 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील सोहम नेमका आहे तरी कोण?

सध्या ह्या मालिकेमधील आसावरी आणि अभिजीत राजे म्हणजेच निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या गुलाबी आणि अव्यक्त प्रेम चांगलंच रंगत असून दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळणं घेत आहेत. यांच्या या प्रेमात शुभ्रासह (तेजश्री प्रधान) मॅडी देखील महत्त्वाचा दुवा ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.