व्हिडिओ: राखी सावंतसोबत लग्नाचे नाटक करणाऱ्या दीपक कलाल याला भररस्त्यात चोप
राखी सावंत आणि दीपक कलाल | (Photo Credits: Instagram)

कॉमेडीयन दीपक कलाल (Deepak Kalal) याला भररस्त्यात चोप मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ वास्तव आहे की, प्रँक याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कलाला याला मारहाण करताना दिसतो. दिल्ली (Delhi) येथील गुरुग्राम येथील ही घटना असल्याचे समजते. दरम्यान, हा व्हिडिओ कोणी बनवला आहे याबाबत ही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

एक व्यक्ती दीपक दलाल याला मारहाण करत असताना दीपक दलाल हा हात जोडून माफी मागतो आहे. तसेच, यापुढे इतरांच्या भावनांना ठेच पोहोचेल असे वर्तन आपण करणार नाही असेही तो सांगताना व्हिडिओत दिसतो. मात्र, अनेकांना हा व्हिडिओ खरा नसून प्रँक असल्याचा वाटते. दीपक दलाल हा इंटरनेटवर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करतो. त्यामुळेच आपण त्याला चोप दिल्याचा दावा मारहाण करणाऱ्या व्यक्तिने व्हिडिओत केला आहे. (हेही वाचा, व्हिडीओ : राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावरील बिकिनी डान्स व्हायरल)

दीपक कलाल हे तसे वादग्रस्त आणि चर्चित व्यक्तिमत्व आहे. काही दिवसांपार्वीच त्याने ड्रामा क्विन राखी सावंत ((Rakhi Sawant)) हिच्यासोबत लग्न केल्याच्या अफवेने तो प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय बनला होता. आपल्या लग्नाची बातमी देण्यासाठी राखी सावंत आणि दीपक कलाल यांनी मिळून एक संयुक्त पत्रकार परिषदही गेतली होती.