व्हिडीओ : राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावरील बिकिनी डान्स व्हायरल
राखी सावंत (Photo Credits: Instagram)

विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहायला आवडनारी राखी सावंत सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे हे आपण जाणताच. राखी प्रत्येकवेळी एकतर वादग्रस्त अथवा खळबळ माजवणारे फोटोज, व्हिडीओज शेअर करत असते, ज्यामुळे तिला नेहमीच ट्रोलींगचा सामना करावा लागतो. आताही राखीने असाच एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ती 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटामधील गाणे 'सुरैय्या' वर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने चक्क बिकिनी घालून डान्स केलेला दिसत आहे. चित्रपटामधील मूळ गाणे हे कतरिना कैफवर चित्रित झाले असून, लोकांना ते फारच आवडले आहे. मात्र आता राखीचा हा नवीन बिकिनी डान्सही सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

याधीही तनुश्री दत्तावर विविध आरोप करून राखीने फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच नुकतेच अनुप जलोटा यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करून तिने वाद ओढवून घेतला होता.