Kavita Chaudhary Passed Away: मोठी बातमी! टीव्ही अभिनेत्री आणि निर्माती कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1980 च्या उत्तरार्धात प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीत तिने गृहिणी ललिता जीची भूमिका साकारली होती.

Kavita Chaudhary (PC- X/@jaidsen)

Kavita Chaudhary Passed Away: अभिनेत्री आणि निर्माती कविता चौधरी (Kavita Chaudhary) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. अमृतसरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनच्या 'उडान' आणि 'योर ऑनर' या टीव्ही मालिकांची निर्मिती करून त्यांनी मनोरंजन विश्वात चांगली ओळख मिळवली होती.

वृत्तानुसार, अभिनेत्रीचे अंतिम संस्कार 16 फेब्रुवारी रोजी शिवपुरी अमृतसर येथे करण्यात आले. कविता चौधरी 'उडान' या मालिकेतील आयपीएस अधिकारी कल्याणीच्या भूमिकेसाठी ओळखली जात होती. याशिवाय कविताने योर ऑनर आणि आयपीएस डायरीसारखे शो देखील केले होते. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीचं गाजली होती. (हेही वाचा -Poonam Pandey Defamation Lawsuit: स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडले महागात; 100 कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल)

कविता ही पोलीस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांची धाकटी बहीण होती. याशिवाय सर्फच्या जाहिरातीत काम करून कविता प्रसिद्ध झाली. 1980 च्या उत्तरार्धात प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीत तिने गृहिणी ललिता जीची भूमिका साकारली होती. (वाचा - (हेही वाचा: Malika Rajput Dies: गायिका, अभिनेत्री मल्लिका राजपूत चा राहत्या घरी आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय)

कविता ही पोलीस अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य यांची धाकटी बहीण होती. कविता चौधरी यांच्या निधनाने मनोरंजन जगताची मोठी हानी झाली आहे. याशिवाय कविताच्या निधनाने तिचे चाहते आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif