Pavitra Rishta 2.0: Ankita Lokhande पुन्हा एकदा साकारणार अर्चना; 'मानव'च्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांचा लोकप्रिय टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांचा लोकप्रिय टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो मध्ये अंकिता लोखंडे 'अर्चना'ची भूमिका साकारणार असून 'मानव'ची भूमिका साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या जागी नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा शो 'पवित्र रिश्ता 2.0' (Pavitra Rishta 2.0) या टायटलसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल. (सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा गाजलेला शो 'पवित्र रिश्ता'चा दुसरा सिझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला; जाणून घ्या डीटेल्स)
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या या शो मध्ये मानवच्या भूमिकेसाठी अभिनेता शहीर शेख (Shaheer Sheikh) याला कास्ट करण्यात आले आहे. 7 वर्षांनंतर अंकिता पुन्हा एकदा अर्चना ची भूमिका साकारणार आहे. तर इतर स्टार कास्ट देखील लवकरच फायनल करण्यात येतील.
सुमारे 1500 एपिसोड्स झालेला अंकिता आणि सुशांतचा 'पवित्र रिश्ता' टीव्ही शो हिट शोज पैकी एक होता. या शो मधील प्रत्येक पात्र अगदी घराघरांत पोहचले. तर अर्चना आणि मानवच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. (Sushant Singh Rajput याच्या स्मृतीदिनी 'फिर मिलेंगे' म्हणत Ankita Lokhande ने शेअर केला दोघांच्या खास क्षणांचा व्हिडिओ, Watch Here)
अलिकडेच अंकिताने या शोला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांसोबत संवाद साधला होता. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा काल पहिला स्मृतीदिन होता. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर अभिनेत्याप्रतीच्या भावना व्यक्त केल्या. तर अंकिता लोखंडेने देखील खास व्हिडिओज पोस्ट करत सुशांत सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)