झी मराठी वरील 'टोटल हुबलाक' मालिकेतून टीव्ही विश्वात एन्ट्री केलेल्या अभिनेत्री मोनालिसा बागल चा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल थक्क
मोनालिसा बागल हिने "सौ शशि देवधर" या २०१४ मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये छोट्या सईची भूमिका मोनालीसाने निभावली होती. इथून तिच्या अभिनयाच्या आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली.
लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद झाले. त्यामुळे अनेक टीव्ही चॅनेल्सवर मालिकांचे जुने एपिसोड्स वा जुन्या मालिका दाखवल्या जात आहे. अशातच प्रेक्षकांना मनोरंजनाचा फुल डोस द्यायला झी मराठीवर एक नवी मालिका सुरु झाली आहे. 'टोटल हुबलाक' (Total Hublak)असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी मोनालिस बागल (Monalisa Bagal) ही अभिनेत्री सध्या बरीच चर्चेत आहे. या मालिकेत किरण गायकवाड सोबत मोनालिसा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. गावरान भूमिकेत दाखवलेल्या मोनालिसाचे सोशल मिडियावर ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल.
मोनालिसा बागल हिने "सौ शशि देवधर" या 2014 मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये छोट्या सईची भूमिका मोनालीसाने निभावली होती. इथून तिच्या अभिनयाच्या आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली.
पाहा मोनालिसाचे ग्लॅमरस फोटो
View this post on Instagram
When you want something, all the universe conspires in helping you to achieve it.
A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal) on
त्यानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या मोनालीसा बागलची प्रेम संकट, झाला भोभाटा, ड्राय डे, सोबत यासारख्या चित्रपटातून कारकीर्द चालूच राहिली. गेल्याच वर्षी परफ्युम या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
View this post on Instagram
Better to be without logic than without feeling. 📷 @yogendra_chavhan
A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal) on
प्रदीर्घ काळ चित्रपट केल्यानंतर तिने आता आपला मोर्चा टिव्ही मालिकेच्या प्रेक्षकांकडे वळवला असून टोटल हुबलाक या नवीन विनोदी मालिकेतून तिने लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा उचलला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)