Sharmishta Raut Wedding: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत-तेजस देसाई यांची अशी जुळून आली रेशीमगाठ; घरातील 'या' व्यक्तीने घडवली दोघांची भेट!
त्यानंतर अनेकांना तिचा होणारा नवरा कोण आहे काय करतो असा प्रश्न पडला होता. या दरम्यान शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपली रेशीमगाठ कशी जुळली याबाबत खुलासा केला आहे.
बिग बॉस मराठी सीजन 1 (Bigg Boss Marathi 1) संपल्यानंतर लोकप्रिय मालिका 'हे मन बावरे' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या (Sharmishtha Raut) हिच्या दारी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. येत्या 11 ऑक्टोबरला शर्मिष्ठा ही तेजस देसाई (Tejas Desai) याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच तिने सोशल मिडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देऊन लग्नपत्रिका पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या मित्रपरिवारासह तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. जूनमध्ये तिचा आणि तेजसचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर अनेकांना तिचा होणारा नवरा कोण आहे काय करतो असा प्रश्न पडला होता. या दरम्यान शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपली रेशीमगाठ कशी जुळली याबाबत खुलासा केला आहे.
शर्मिष्ठाचे हे अरेंज मॅरेज असले तरीही लव्ह मॅरेजच आहे असे शर्मिष्ठाने या मुलाखतीत म्हटले आहे. शर्मिष्ठा आणि तेजस देसाईची ओळख तिची बहिण सुप्रियाने करुन दिली. त्यावेळी तेजसला शर्मिष्ठा पहिल्या भेटीतच आवडली. त्यावेळी तेजसला ती एक अभिनेत्री आहे हे माहित नव्हते. कारण तो जास्त मालिका पाहत नाही. आणि तशी शर्मिष्ठाचीही अट होती की त्याने आधी तिला माणूस म्हणून ओळखावे मग अभिनेत्री म्हणून. मात्र शर्मिष्ठाला थोडा वेळ हवा होता. त्यानंतर तिने काही महिन्यांनी होकार कळवला. Sharmishtha Raut Wedding: बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत हिचे लवकरच होणार शुभमंगल सावधान! अभिनेत्रीने सोशल मिडियावर शेअर केली निमंत्रण पत्रिका
या दरम्यान तिच्या तेजससोबत झालेल्या भेटीगाठीत ते एकमेकांना आणखीनच चांगेल ओळखू लागले. त्यानंतर त्याने तिचे चित्रपट पाहिले. मालिका पाहिल्या आणि त्यानंतर तिच्या कामाचा त्याला अंदाज आलाय मात्र त्याची याबाबत काही हरकत नव्हती. त्यामुळे हळूहळू त्यांची मन जुळत गेली आणि हाच आपला 'मिस्टर परफेक्ट' आहे असे शर्मिष्ठाला वाटले.
तेजस देसाई हा बोस कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. त्याचबरोबर तो फोक डान्सर म्हणूनही शोज करतो. त्यामुळे त्याला थोड्या बहुत प्रमाणात या क्षेत्राची माहिती होती. त्यामुळे त्याने आपल्याशी छान जमवून घेतले असे शर्मिष्ठाने मुलाखतीत म्हटले आहे.
येत्या 11 ऑक्टोबरला हे दोघे लग्न करणार असून अगदी साधेपणाने कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे.