Coronavirus Lockdown: दूरदर्शन वर रसिकांच्या भेटीला पुन्हा येणार 'शक्तिमान', ' श्रीमान श्रीमती', 'चाणाक्य' सारख्या दर्जेदार मालिका; पहा या मालिकांच्या पुर्नप्रक्षेपणाच्या वेळा
दूरदर्शनवर गाजलेल्या श्रीमान श्रीमती, शक्तिमान, व्योमकेश बक्षी,सर्कस यासारख्या मालिकादेखील पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.
सध्या देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. अशामध्ये जनसामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. दरम्यान या काळात नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊन आणि होम क्वारंटीनचा काळ आता पुन्हा जुन्या आठवणींमध्ये रममाण होत घालवण्यासाठी दूरदर्शन वाहिनी सज्ज झाली आहे. डीडी नॅशनल वर यापूर्वीच रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. आता त्यापाठोपाठ दूरदर्शनवर गाजलेल्या श्रीमान श्रीमती, शक्तिमान (Shaktimaan), व्योमकेश बक्षी,सर्कस यासारख्या मालिकादेखील पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. मग तुम्हीदेखील रटाळ सासू सुनांच्या भांडणांच्या मालिकांना कंटाळला असाल तर पुन्हा 90 च्या दशकातील या जुन्या आणि दूरदर्शनवर पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत मग पहा कोणत्या वेळेत कोणती मालिका पाहता येणार? केवळ Google 3D Animals नव्हे तर Bolo App ते YouTube वरील DIY #WithMe... बच्चेकंपनीचा 21 दिवस लॉकडाऊनचा काळ सत्कारणी लागेल 'या' Google Apps Features सोबत!
एप्रिल 2020 पासून पुन्हा टेलिकास्ट केले जाणार्या लोकप्रिय मालिका
1. शक्तिमान :
मुकेश खन्ना यांची लोकप्रिय मालिका शक्तिमान एप्रिल महिन्यात डीडी वर नियमित दुपारी 1 -2 या वेळेत दाखवली जाणार आहे.
2. श्रीमान श्रीमती:
मकरंद अधिकारी यांची कॉमिक सीरीज श्रीमान श्रीमती आता दुपारी 2 वाजता टेलिकास्ट केली जाणार आहे.
3. चाणाक्य:
47 भागांची चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित चाणाक्य ही मालिका डीडी भारतीवर एप्रिल महिन्यात पुन्हा दाखवली जाणार आहे.
4. उपनिषाद गंगा:
चिन्मय मिशन ट्रस्ट निर्मित आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 52 भागांची मालिका डीडी भारतीवर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखवली जाणार आहे.
5. कृष्ण काली:
18 भागांची ही मालिका डीडी नॅशनलवरनियमित रात्री 8.30 वाजता टेलिकास्ट केली जाणार आहे.
डीडीवर सध्या पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार्या काही जुन्या मालिका
लोकाग्रहास्तव डीडी नॅशनलवर नियमित सकाळी आणि रात्री 9 वाजता रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण सुरू करण्यात आले आहे तर महाभारत दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता दाखवले जाते. दरम्यान व्योमकेश बक्षी दुपारी 11 वाजता,सर्कस रात्री 8 वाजता, हम है ना ही मालिका डीडी नॅशनलवर रात्री 10 वाजता तर तू तौता मै मैना ही मालिका रात्री 10.30 वाजता दाखवली जाते.
Coronavirus Lockdown : आजपासून 'स्वराजरक्षक संभाजी' मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला : Watch Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिल्याने सध्या घरात आबालवृद्ध एकत्र आले आहेत. अशावेळेस जुन्या आठवणींना उजाळा देत 90च्या दशकात पुन्हा जाऊन बालपणीच्या मजेशीर आठवणी शेअर करण्याचा, जुने फोटो अल्बम काढून किस्से ऐकण्याचा कार्यक्रम आता अनेक घराघरात रंगायला लागला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)