Ramayan पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; कधी आणि कुठे घ्याल शो चा आनंद? जाणून घ्या
अनेक वर्षांनी पुन्हा प्रसारित झालेल्या या मालिकेला जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला.
मागील वर्षी कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) दरम्यान टीव्हीवर रामानंद सागर यांच्या रामायण (Ramayan) मालिकेचे प्रसारण करण्यात आले होते. अनेक वर्षांनी पुन्हा प्रसारित झालेल्या या मालिकेला जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळेच टीआरपीचा (TRP) विक्रम नोंदवला गेला. आता पुन्हा एकदा राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश्य नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रामायण पुन्हा पाहायला मिळणार ही अनेकांसाठी आनंदवार्ता असेल. परंतु, कधी आणि कुठे घ्याल या मालिकेचा आनंद? त्याविषयी जाणून घेऊया. पौराणिक कथा रामायण तुम्ही स्टार भारत या चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता पाहू शकाल. स्टार भारत चॅनलने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यामुळे ही संधी अजिबात दवडू नका.
STAR भारत Tweet:
(हे ही वाचा: Ramayan Funny Memes & Jokes: रामायण मालिकेच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड' नंतर सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!)
रामायण पुन्हा प्रसारित झाल्यानंतर अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. तसंच मागील वर्षी पुन:प्रसारित झालेल्या या मालिकेवर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले होते. दरम्यान, मागील वर्षी लॉकडाऊन काळात रामायणासोबत 'महाभारत','श्री कृष्णा' मालिका देखील दूरदर्शनवर पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या.