Rajmata Jijabai Death Anniversary 2021: ऑनस्क्रीन 'जिजाबाई' साकारलेल्या अभिनेत्री, पाहा प्रतीक्षा लोणकर, मृणाल कुलकर्णी, नीना कुलकर्णी, भार्गवी चिरमुले यांच्या भूमिकेची झलक

राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनदेखील त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. मराठीत अनेक मालिकांमध्ये आपण जिजाऊ यांची भूमिका असलेले पात्र पाहिले आहे.

Photo Credit: Facebook & Instagram

सध्या च्या जगात प्रत्येकजण आपापल्या कामत खुप व्यस्त आहेत. ऑफिस च प्रेशर , कामाची दगदग या सगळ्यामध्ये थोडा का असेना मनोरंजन होण्यासाठी आपण वेगवेगळे पर्याय शोधत असतो. या पर्यायापैकी सर्वात वरच्या स्थानावर येते ती म्हणजे मालिका. कितीही बिझी शेड्यूल मधून आपल्यातील अनेक जण आपल्या आवडत्या मालिकेसाठी दिवसातील किमान अर्धा तास तरी वेळ काढतातच. प्रेक्षकांची ही आवड लक्षात घेऊन हल्ली मालिकांचे विषय ही बदलू लागले आहेत. सुरुवातीला कुटुंबावर दाखवल्या जाणाऱ्या मालिका हल्ली इतिहासातील महत्वाच्या  गोष्टी हाताळताना दिसू लागल्या आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, झाशीची राणी, जिजाबाई यांची पात्र आता आपल्याला मालिकेमध्ये दिसू लागली आहेत.इतिहासातील अशी महत्वाची पात्र सकरताना खरी कसोटी असते ती त्या भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीची. आज या विषयावर चर्चा करण्याचे निमित्त ही याच विषयाशी निगडित आहे. (Rajmata Jijabai Punyatithi 2020: राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी )

17 जून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी होईल. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनी त्या प्रचलित आहेत. मराठा साम्राज्याच्या संस्थापक म्हणूनदेखील त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. मराठीत अनेक मालिकांमध्ये आपण जिजाऊ यांची भूमिका असलेले पात्र पाहिले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी अभिनेत्रींनी साकरलेल्या आणि प्रेक्षकांना तितक्याच आवडलेल्या अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत.पाहूयात जिजाबाई भूमिका साकारलेल्या आणि  प्रेक्षकांनाही तितक्याच आवडलेल्या अभिनेत्री.

प्रतीक्षा लोणकर 

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर ( Pratiksha Lonkar) जिजाबाई यांची भूमिका साकारली आहे.

नीना कुलकर्णी 

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत अभिनेत्री नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) या मालिकेत माता जिजाबाई हे पात्र साकारत आहेत.

मृणाल कुलकर्णी  

'राजा शिवछत्रपती' या मालिकेत आणि 'फत्तेशिकस्त' या मराठी गाजलेल्या सिनेमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ( Mrunal Kulkarni) यांनी जिजाबाई यांची भूमिका पार पाडली होती.

भार्गवी चिरमुले 

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजाऊ माँ साहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले (bhargavi chirmule) या अभिनेत्रीने साकारली आहे.

आतापर्यंत जिजाऊंची भूमिका असणाऱ्या अनेक चित्रपट तसेच नाटकांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement