Bigg Boss 14: सलमान खानच्या ‘बिग बॉस 14’ सीझनमधील स्पर्धकांची यादी आली समोर; जस्मीन भसीन, एजाज खान, नैना सिंग, निशांतसिंग मलकानी आदी कलाकार सहभागी होणार?
‘बिग बॉस’चे 13 वे सीझन चांगलचं गाजलं होतं. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिग बॉसचं शुटिंग थांबवण्यात आलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस 14’ च्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. ‘बिग बॉस’चा एक प्रोमो सध्या प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 3 ऑक्टोबर 2020 रोजी तुम्हाला ‘बिग बॉस 14’च्या ग्रँड प्रीमिअर पाहता येणार आहे.
Bigg Boss 14: ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन चांगलचं गाजलं होतं. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिग बॉसचं शुटिंग थांबवण्यात आलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस 14’ च्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. ‘बिग बॉस’चा एक प्रोमो सध्या प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 3 ऑक्टोबर 2020 रोजी तुम्हाला ‘बिग बॉस 14’च्या ग्रँड प्रीमिअर पाहता येणार आहे.
प्रीमिअरची तारीख जवळ आली असतानाचं सर्व प्रेक्षकांचा शो पाहण्यासाठी उत्साह वाढला आहे. कोरोना विषाणूचं संकट असताना बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांना एकाच घरात लॉक केलं जाईल, त्यामुळे बिग बॉस 14 चा सीझन पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. (हेही वाचा -Bigg Boss 14 Grand Premiere Date: सलमान खानचा शो 'बिग बॉस 14' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज; जाणून घ्या ग्रँड प्रीमियरची तारीख आणि वेळ (Watch Video))
जस्मीन भसीन -
इजाज खान:
नैना सिंह -
निशांतसिंग मलकानी -
View this post on Instagram
If we could only turn back time #throwbackwednesday
A post shared by Nishant Malkani (@nishantsinghm_official) on
‘बिग बॉस 14’ च्या सीझनमध्ये नेमकी कोणते स्पर्धक असणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काही स्पर्धकांची अजूनही बिग बॉसच्या मेकर्सविषयी बोलणी सुरु आहे, तर काहींना या शोसाठी साईन करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, ‘बिग बॉस 14’ च्या सीझनमध्ये निया शर्मा, जास्मीन भसीन, एली गोनी, नैना सिंग, निशांतसिंग मलकानी आणि नेहा शर्मा आदींची नावे समोर आली आहेत. तथापि, नेहा आणि निया दोघींनीही हा कार्यक्रम करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या यादीमध्ये केवळ 7 नावे असल्याची आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्पॉटबॉय ई मधील एका अहवालानुसार, काही स्पर्धक आठवड्यांनंतर बिग बॉसमध्ये एन्ट्री करतील. ‘बिग बॉस 14’ च्या सीझनमध्ये विव्हियन दशेना, राजीव सेन, अध्ययन सुमन आणि ऋत्विक अरोरा, आदी नावे समोर आली होती. मात्र, या सर्वांनी ही ऑफर नाकारल्याचं म्हटलं जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)