NCB ऑफिसर समीर वानखेडे यांच्या पत्नीचा खुलासा, फक्त 2 तासांच्या झोपेसह प्रत्येक दिवशी सीक्रेट ऑपरेशनवर असल्याची दिली माहिती

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिचा नवरा समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्यामुळे अधिक चर्चेत आली आहे.

NCB ऑफिसर समीर वानखेडे यांच्या पत्नीचा खुलासा, फक्त 2 तासांच्या झोपेसह प्रत्येक दिवशी सीक्रेट ऑपरेशनवर असल्याची दिली माहिती
Sameer Wankhede and Kranti Redkar (Photo Credits-Instagram)

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिचा नवरा समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. समीर जे त्यांनी नुकत्याच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी येथून अटक केली आहे. याआधी त्यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज रॅकेट मध्ये सुद्धा काही सेलेब्सला आपल्या रडावर आणले होते. समीर यांच्या कार्याचे खुप कौतुक केले जात आहे. अशातच आता या छापेमारीवर समीर यांची पत्नी क्रांती रेडकर आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सुद्धा रिअॅक्शन दिली आहे.

क्रांती हिने असे म्हटले की, भले समीर आपल्या मुलांकडे कामामुळे लक्ष देत नसले तरीही तिला त्यांच्यावर गर्व आहे. ईटाइम्स यांच्यासोबत बोलताना क्रांतीने म्हटले, समीर नेहमीच मेहनत करतात. कारण आता ते बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरणावर काम करत आहेत. यासाठीच ते अधिक चर्चेत येत आहे. कधी कधी ते ऐवढे व्यस्त असतात की, 24/7 तास काम करता. अगदी 2 तास फक्त झोपतात असे ही क्रांती हिने म्हटले. या व्यतिरिक्त जेव्हा कधी फोनवर बोलणे होते तेव्हा त्यांना आम्ही डिस्टर्ब करत नाही. कारण प्रत्येक दिवशी ते कोणत्या ना कोणत्या सीक्रेट ऑपरेशनवर काम करत असतात. अशा मिशन बद्दल ते आम्हाला सांगत नाहीत. समीर असे व्यक्ती आहेत जे एक मिनिट सुद्धा आपला वेळ फुकट घालवू शकत नाहीत. जेव्हा घरी असतात तेव्हा सुद्धा आपल्या टीम सोबत बातचीत करत असतात. पण या सर्व गोष्टींसाठी मी कधीच तक्रार करत नाही.(Aryan Khan Drug Case: शाहरुख खानचा मुलगा आर्यनला सपोर्ट करण्यासाठी Mika Singh आला पुढे; कारवाईला लगावला टोला)

दरम्यान, समीर यांना माहितेय मी जेव्हा घरात असते तेव्हा सर्व काही नीट सांभाळून घेईन. आपले खासगी आयुष्य आणि परिवाराचा त्याग करतात पण त्यावर ही मला गर्व असल्याचे क्रांती हिने म्हटले. कारण ते देशासाठी सर्वकाही करत आहेत. मला आनंद वाटतो की, ते सध्या मीडिला इंटरव्यू देतात नाहीत तर ते खुप रिजर्व आहेत. ऐवढेच नव्हे तर ते खुप कमी हसतात.

(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2021 06:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).