Punjab Election Result 2022: नवज्योत सिंह सिद्धु यांच्या पराभवानंतर अर्चना पूरण सिंह यांची खुर्ची धोक्यात! Twitter वर होतयं ट्रेंडिंग
निवडणुकीचा निकाल येताच अचानक प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'द कपिल शर्मा शो'मध्ये खुर्चीवर बसलेली अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) अचानक ट्विटरवर ट्रेंड करू लागली.
देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल आज आले आहेत. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची (BJP Won) आघाडी आहे. उत्तर प्रदेशात (UP) भाजपला मोठी आघाडी मिळाली असून तेथे भाजपचे सरकार स्थापन होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचा (AAP) झेंडा फडकताना दिसत आहे. माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचा पूर्व अमृतसरमधून निवडणुकीत पराभव झाला आहे. निवडणुकीचा निकाल येताच अचानक प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'द कपिल शर्मा शो'मध्ये खुर्चीवर बसलेली अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) अचानक ट्विटरवर ट्रेंड करू लागली.
ट्विटरवर, लोक मीम्सच्या माध्यमातून म्हणू लागले की विधानसभेची जागा गमावल्यानंतर सिद्धूची नजर आता द कपिल शर्मा शोच्या खुर्चीकडे असेल. आता अशा परिस्थितीत लोक असेही म्हणू लागले आहेत की पंजाब निवडणुकीनंतर जर कोणाची खुर्ची धोक्यात आली असेल तर ती अर्चना पूरण सिंह यांची आहे. ट्विटरवर अशा अनेक मजेशीर पोस्ट पाहायला मिळत आहे. (हे ही वाचा Lock Upp: भाजपला पाठींबा देणाऱ्या अभिनेत्री Payal Rohatgi ला माहित नाही भारताच्या राष्ट्रपतींचे नाव; सोशल मिडियावर ट्रोल)