Navjot Singh Sidhu Returns To Kapil Sharma's Show: अर्चना पूरन सिंहने गमावली कपिल शर्मा शोची खुर्ची? 5 वर्षांनी परतले नवज्योतसिंग सिद्धू, पहा नवीन प्रोमो
5 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे खरोखरच शोमध्ये परतले आहेत का? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यादरम्यान नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांची कविता वाचताना आणि हसताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिद्धू जजच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.
Navjot Singh Sidhu Returns To Kapil Sharma's Show: कपिल शर्माचा नवा शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) सध्या नेटफ्लिक्सवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या शोचा हा दुसरा सीझन आहे. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) हा शो होस्ट करत आहे. तसेच अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) या जज म्हणून शोमध्ये उपस्थित आहेत. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. यानंतर सेटवर एकच गोंधळ उडताना दिसतो.
दरम्यान, 5 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे खरोखरच शोमध्ये परतले आहेत का? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यादरम्यान नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांची कविता वाचताना आणि हसताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिद्धू जजच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत, ज्यासाठी कपिल शर्मा देखील आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. (हेही वाचा - Shaktimaan Teaser: तब्बल 19 वर्षांनी परततोय शक्तीमान; मुकेश खन्ना यांनी शेअर केली पहिली झलक, पहा व्हिडिओ)
तथापी, अर्चना मागून येते आणि कपिलला सांगते की तिला तिची खुर्ची परत हवी आहे. व्हिडिओमध्ये अर्चना पूरण सिंह कपिलला सरदार साहेबांना माझी खुर्ची सोडण्यास सांगण्यास सांगते. नवज्योत सिंग सिद्धूला शोच्या खुर्चीवर पाहून सुरुवातीला कपिल शर्मालाही धक्का बसतो. त्यांना वाटतं की, कोणीतरी सिद्धूसारखा वेश केला आहे. पण नंतर त्यांना कळलं की ते प्रत्यक्षात नवजोत सिंग सिद्धू आहेत. वास्तविक, ते शोमध्ये जज म्हणून नाही तर पत्नीसोबत पाहुणा म्हणून आले होते.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत क्रिकेटर हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसर हे देखील शोमध्ये पाहुणे म्हणून दिसले. शोच्या प्रोमोमध्ये सेटवर सगळे धमाल करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हरभजन सिंग म्हणतो की, नवज्योत सिंग सिद्धूची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्याचवेळी कॉमेडियन सुनील ग्रोव्हरही सिद्धूसारखा पोशाख घालून शोमध्ये आला, ज्यामुळे सेटवर गोंधळ उडाला. हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर चाहते हा एपिसोड पाहण्यासाठी खूपचं उत्सुक झाले आहेत.
अर्चना पूरण सिंह यांनी 2019 मध्ये कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूची जागा घेतली होती. नवज्योत सिंग सिद्धूने जवळपास 7 वर्षे कपिल शर्माच्या शोमध्ये जजची भूमिका साकारली होती. ते 2013 ते 2019 या काळात शोमध्ये दिसले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)