आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचं शीर्षकगीतं; पहा व्हिडिओ

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन रसिकांच्या भेटीला येत आहे.

Adarsh Shinde (Photo Credits: Instagram)

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका लवकरच स्टार प्रवाहवरुन रसिकांच्या भेटीला येत आहे. पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख (Sagar Deshmukh) या मालिकेत बाबासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. बाबासाहेबांच्या लूकमधील सागर याची पहिली झलक समोर आल्यानंतर आता मालिकेचं शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या संकल्पनेतून हे गीत साकारलं आहे. (सागर देशमुख साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका; पहा पहिली झलक)

आदर्श आणि उत्कर्ष यांच्या लेखणीतून अवतरलेले गीत या दोघांनीच संगीतबद्ध केले आहे. तर आदर्शच्या दमदार आवाजात आपल्याला मालिकेचं टायटल ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. या गीताची खास झलक आदर्शने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

पहा शीर्षकगीताची खास झलक:

18 मे बौद्ध पौर्णिमेपासून महामानवाचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावर उलघडणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif