कुशल बद्रिके याने कुटूंबांसोबत गायलेले 'Go Coronia' हे भन्नाट गाणे तुम्ही ऐकले का? मोकळ्या वेळेत घरी Creativity करण्याचा चाहत्यांना दिला सल्ला

चला हवा येऊ द्या' फेम विनोदी कलाकार कुशल बद्रिके याने आपल्या कुटूंबियांसोबत मोकळ्या वेळेत केलेली खूप भन्नाट Creativity सोशल मिडियावर शेअर केली आहे. यात कुशल बद्रिके याने कुटूंबियांसोबत 'Go Coronia' असे अफलातून गाणे गायिले आहे.

Kushal Badrike (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) देशात वाढता धोका लक्षात घेता 22 मार्चला भारतात 'जनता कर्फ्यू' घोषित करण्यात आला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सिनेमा, मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व कलाकार आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवत आहेत. मात्र 24 तास शूटिंगमध्ये व्यस्त असलेले कलाकार घरात मोकळ्या वेळेत काय करावे यासाठी नवनवीन शक्कल शोधत आहेत. यात 'चला हवा येऊ द्या' फेम विनोदी कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने आपल्या कुटूंबियांसोबत मोकळ्या वेळेत केलेली खूप भन्नाट Creativity सोशल मिडियावर शेअर केली आहे. यात कुशल बद्रिके याने कुटूंबियांसोबत 'Go Coronia' असे अफलातून गाणे गायिले आहे.

घरात बसून आपल्या कुटूंबियांसोबत वेळ घालवा आणि आपल्या क्रिएटिव्हिटीला वाव देऊन असे काही तरी भन्नाट गोष्टी करुन मला टॅग करा असे त्याने या पोस्ट खाली लिहिले आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांचे खास आवाहन (Watch Video)

पाहा 'गो कोरोनिया' गाणे

 

View this post on Instagram

 

घरी काहीतरी creative करा आणी मला नक्की TAG करा. माझ्या कुटूंबाकडून थोडं मनोरंजन आणी थोडं प्रबोधन. @sunayana_badrike_kathak @swapna_pawar

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

माझ्या कुटूंबाकडून मी तुमचं थोडं मनोरंजन आणी थोडं प्रबोधनाचे काम करत आहे असेही त्याने या व्हिडिओ खाली म्हटले आहे.

Happy Birthday Kangana Ranaut : कंगनाच्या आयुष्यतल्या काही खास गोष्टी जाणून घ्या : Watch Video

हे गाणे त्याच्या चाहत्यांना खूप आवडले असून लोकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा गाण्याला आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement