मन उडु उडु झालं । PC: Instagram

झी मराठी वर सध्या नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे त्यामध्ये अजून एका नव्या मालिकेची घोषणा झाली आहे. ‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Jhala) या नव्या मालिकेच्या प्रोमोने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेमध्ये हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) ही फ्रेश जोडी दिसणार आहे. ‘फुलपाखरू’या मालिकेतून रसिकांना यापूर्वी हृताने भुरळ घातली होती आता पुन्हा नव्या मालिकेतून हृता डेली सोपच्या माध्यमातून भेटायला येणार असल्याने रसिकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे. Shreyas Talpade चं मराठी टेलिव्हिजन वर पुनरागमन; ‘माझी तुझी रेशीमगाठ' मधून रसिकांच्या भेटीला; पहा प्रोमो.

हृता सोबत दिसणारा नवा उमदा कलाकार अजिंक्य राऊत  आहे. अथर्व यापूर्वी ‘विठूमाऊली’या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता. आता तो पहिल्यांदाच हृता सोबत रोमॅन्टिक अंदाजात दिसणार आहे. ही मालिका झी मराठीवर 30 ऑगस्ट पासून रात्री 7.30 वाजता दिसणार आहे. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांमध्ये 'येऊ कशी तशी मी नांदायला' वगळता इतर सार्‍या मालिकांच्या ऐवजी नव्या मालिकांचे प्रोमो आले आहेत. Hruta Durgule झळकणार टाईमपास 3 मध्ये? इंस्टाग्राम पोस्ट मधून नव्या प्रोजेक्टचे संकेत.

 

'मन उडु उडु झालं' प्रोमो

दरम्यान 'मन उडु उडु झालं' सोबत सुरू होणार्‍या नव्या मालिकांच्या यादीमध्ये 'ती परत आलीये', 'तुझी माझी रेशीमगाठ', 'मन झालं बाजिंद', ' 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेचा समावेश आहे.