Majha Hoshil Na Serial: 'माझा होशील ना' मालिकेत 'लाडू' फेम बालकलाकार राजवीर सिंह ची होणार एन्ट्री, साकारणार पंजाबी मुलाची भूमिका

या मालिकेत राजवीरच्या पात्राचे नाव 'बिल्लू' असणार आहे. बिल्लू हा बंधू मामांचा मुलगा दाखवला आहे. त्यामुळे राजवीरच्या चाहत्यांना पुन्हा एकदा बिल्लूच्या रुपात याची धमालमस्ती पाहायला मिळणार आहे

Majha Hoshil Na (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'माझा होशील ना' (Majha Hoshil Na) मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सई बिराजदार (Sai Birajdar) आणि आदित्य कश्यप (Aditya Kashyap) यांचे लग्न कधी आणि कसे होणार हे पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या सुयश यांच्या लग्नात कधी अडथळे आणत आहे त्यावरून हे लग्न कसे होणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. त्याचदरम्यान आता नवीन प्रोमो नुसार, या मालिकेत आता एका बालकलाकाराची एन्ट्री होणार आहे. हा बालकलाकार दुसरा तिसरा कुणी नसून सर्वांचा लाडका 'लाडू' (Ladu) ऊर्फ राजवीर सिंह (Rajvir Singh Gaikwad) आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लाडू आता माझा होशील ना या मालिकेत एका पंजाबी मुलाची भूमिका साकारणार आहे.

या मालिकेत राजवीरच्या पात्राचे नाव 'बिल्लू' असणार आहे. बिल्लू हा बंधू मामांचा मुलगा दाखवला आहे. त्यामुळे राजवीरच्या चाहत्यांना पुन्हा एकदा बिल्लूच्या रुपात याची धमालमस्ती पाहायला मिळणार आहे.हेदेखील वाचा- Majha Hoshil Na मालिकेतील सई आणि आदित्य चा Valentine's Day दिवशी उडणार लग्नाचा बार, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सध्या सुरु असलेल्या भागात बंधू मामाची पत्नी पाहायला मिळाली. आता पुढील भागात बंधू मामाच्या मुलाची म्हणजेच लाडूची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. तुझ्यात जीव रंगला मध्ये लाडू पात्र साकारताना राजवीर सिंह धमाल उडवून दिली होती. तिच किंवा त्याहून अधिक दंगामस्ती करताना तो या मालिकेत दिसेल असेच या प्रोमोज वरुन दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement