आज रात्री 9 वाजता सुरु होणार KBC कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन, 'या' पद्धतीने तुम्ही सहभागी होऊ शकता
तर आज रात्री 9 वाजता टीव्हीवर केबीसी (KBC) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत.
बॉलिवूडमध्ये बीग बी या नावाने ओखळ असणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सीझन 12 साठी आता रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. तर आज रात्री 9 वाजता टीव्हीवर केबीसी (KBC) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या प्रेक्षकाला या क्रार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग्य उत्तर देण्यासाठी प्रेक्षकांना एसएमएस किंवा SonyLIV अॅपवर जाऊन अचून उत्तर देणे अत्यावश्यक आहे. अमिताभ बच्चन हे 9 ते 22 मे पर्यंत प्रत्येक दिवशी प्रश्न विचारणार आहेत. याच दरम्यान आता प्रेक्षकांसाठी ही सर्वात मोठी संधी असून तुम्हाला तुमचे लक आजमवता येणार आहे. खरंतर अमिताभ बच्चन या शो मुळे बहुतांश लोकांचे नशीब बदलले असून त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण केली आहेत.
अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, आम्ही पुन्हा येत आहोत. यापूर्वी सोनी टीव्ही यांनी व्हिडिओ शेअर करत असे लिहिले होते की, प्रत्येक गोष्टीसाठी ब्रेक लागून शकतो मात्र स्वप्नांसाठी नाही. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही परत येत आहोत. तर अमिताभ बच्चन यांचा केबीसी 12 चा सीझनसाठी रजिस्ट्रेशन आज रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे.(लॉक डाऊनमध्ये सुरु झाली टीव्हीवरील 'हे' मोठे शो परत येण्याची तयारी; घरी बसून देऊ शकता ऑडिशन)
ज्यावेळी केबीसीचा प्रोमो आला होता त्यावेळी वाद ही निर्माण झाला होता. कारण लॉकडाउन सुरु असताना चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सीरीज यांच्या शुटिंगचे काम पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र याच काळात बिग बी यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे शुटिंग कसे केले असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला. त्यावर अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण देत असे म्हटले की, मी काम केले असून कोणाला त्याबाबत त्रास असेल त्यांनी तो त्यांच्याजवळच ठेवावा. जेवढी शक्य होईल तेवढी सावधगिरी सु्द्धा बाळगली गेली आहे. दोन दिवसांचे काम एकाच दिवशी पूर्ण केले आहे. अवघ्या काही तासाच काम संपवले आहे.