करिना कपूर हिच्या गोलंदाजीवर कपिल देव यांची हिट फलंदाजी, पाहा व्हिडिओ
नुकत्याच या शो मध्ये क्रिकेटमधील दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांनी उपस्थिती लावली होती.
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) सध्या हिंदी रियॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' (Dance India Dance) 7 मधून परिक्षकाचे काम करत आहे. नुकत्याच या शो मध्ये क्रिकेटमधील दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी कपिल देव शो मधील कलाकारांसोबत भरपूर मजामस्ती करताना दिसून आले.
या शो मधील एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये करिना कपूर हिच्या गोलंदाजीवर कपिल देव यांची हिट फलंदाजी करताना दिसून आले. तसेच करिना हिला कपिल देव यांनी फलंदाजी कशी करावी हे सुद्धा शिकवले. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून करिना हिच्या चाहत्यांना तो फार पसंदीस पडला आहे.(जगप्रसिद्ध वोग मॅगझीनसाठी गौरी खान ने पहिल्यांदाच शेअर केले मन्नत चे आतील फोटो, पाहा गौरी खानचे मन्नत मधील हॉट फोटोशूट)
तसेच गोलंदाजी आणि फलंदाजीचा खेळ रंगल्यानंतर कपिल देव यांनी तैमूरचे नाव लिहित त्यांच्या नावाची सही केलेली एक बॅट करिना दिली. यावर करिना हिने आनंद व्यक्त केला असून हे माझ्यासाठी खुप मोठी भेट असल्याची भावना व्यक्त केली आहे.