Isha Keskar Hot Swimsuit Photo: 'बानूबया' फेम ईशा केसकर हिचा समुद्रातील स्विमस्यूट मधील हॉट फोटो पाहून चाहते होतील पाणी-पाणी

यावेळी ती समुद्रात स्विम स्यूटमध्ये दिसत आहे आणि तिचे भिजलेले केस आणि गोड स्माईल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Isha Keskar Swim Suit Hot Photo (Photo Credits: Instagram)

बानू बया आणि शनाया फेम ईशा केसकर (Isha Keskar) आजही लोकांच्या मनात कायम आहे. शनायापेक्षा जय मल्हार मधील बानू जास्त लोकप्रिय झाली होती. त्यात बानूचा अवतार नववारी घालून एखाद्या गावातील मुलीप्रमाणे होता. त्यानंतर माझ्या नव-याची बायको मध्ये तिचा बोल्ड लूक (Bold Look) पाहून तिचे सर्वच चाहते थक्क झाले. असाच एक झटका तिच्या चाहत्यांना आता बसणार आहे. ईशा केसकर ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला स्विमस्यूटमधील Swim Suit) एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून या फोटोला 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या फोटोमध्ये ईशा गोव्याच्या समुद्रामध्ये छान मजा घेताना दिसत आहे. यावेळी ती समुद्रात स्विम स्यूटमध्ये दिसत आहे आणि तिचे भिजलेले केस आणि गोड स्माईल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हेदेखील वाचा- ईशा केसकर ने सांगितलं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून बाहेर पडण्याचं कारण (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by ISHA (@ishackeskar)

ईशा आणि ऋषी सक्सेना गेले साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे अनेक फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. 'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेतून ऋषी सक्सेना घरोघरी पोहचला. त्यानंतर त्याचा हिंदी मालिकेतील प्रवास सुरु आहे. तर 'जय मल्हार' या मालिकेतील ईशाने साकारलेली 'बानू' लक्षवेधी ठरली. तसेच ईशा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असल्याने आपल्या चाहत्यांसोबत आपले अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. ईशाचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल अकाउंटवर पाहायला मिळतो.

ईशाने जय मल्हार आणि माझ्या नव-याची बायको या मालिकेव्यतिरिक्त अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या 'गर्लफ्रेंड' सिनेमातही ईशा झळकली होती.