Gudi Padwa 2021: Dakkhancha Raja Jyotiba गुढीपाडवा विशेष कार्यक्रमात पार पडणार ज्योतिबाचा भव्य राज्याभिषेक सोहळा (Watch Video)
तर या मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे.
Gudi Padwa 2021: यंदाचा गुढीपाडवा येत्या 13 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. तर महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासून हिंदू नवं वर्षाची सुरुवात होते असे म्हणतात. तर साडेतीन शुभ मुहूर्त असलेल्या या दिवसाचे औचित्स साधत घरात विविध गोड पदार्थांसह देवाची मोठ्या श्रद्धेने पुजा या दिवशी खासकरुन केली जाते. त्याचसोबत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक सोन सुद्धा खरेदी करतात. याच पार्श्वभुमीवर स्टार प्रवाह वरील दख्खनचा राजा ज्योतिबा या कार्यक्रमात गुढीपाडवा विशेष भाग प्रसारित केला जाणार आहे. तर या मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे.(Gudi Padwa 2021 Rangoli Designs: गुढीपाडव्याच्या दिवशी किचनमधील साहित्य वापरून दारासमोर काढा या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स)
गुढीपाडव्याच्या दिवशी दख्खनचा राजा ज्योतिबा मध्ये भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. तर प्रत्यक्षात प्रेक्षकांना ज्योतिबाच्या राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या विशेष एपिसोडसाठी मालिकेच्या टीमने खास मेहनत सुद्धा घेतल्याचे सांगण्यात आले आहे.(Gudi Padwa 2021 Date: यंदा गुढीपाडवा कधी साजरा होणार? जाणून घ्या हिंदू नववर्षाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त)
तर भव्यदिव्य सेटसोबतच, रोषणाई, भरजरी वस्त्र, दुधाचा अभिषेक असा राजेशाही थाट करण्यात आला आहे. तर कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हा राज्याभिषेक सोहळ्याचे शूटिंग केल्याचे ही सांगण्यात आले आहे.