प्रसिद्ध अभिनेत्री Leena Acharya यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

सेठ जी, आप के आ जाने से, मेरी हानिकारक बीवी अशा बर्‍याच शोचा हिस्सा असणाऱ्या लीना आचार्य यांची किडनी निकामी झाल्यामुळे, त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला.

Leena Acharya (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लीना आचार्य (Leena Acharya) यांचे शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. सेठ जी, आप के आ जाने से, मेरी हानिकारक बीवी अशा बर्‍याच शोचा हिस्सा असणाऱ्या लीना आचार्य यांची किडनी निकामी झाल्यामुळे, त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री गेल्या दीड वर्षापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होती. काही काळापूर्वी त्यांच्या आईने आपली किडनी दान केली होती, परंतु यामुळेही लीना यांचा जीव वाचू शकला नाही. सेठ जी मध्ये लीना यांची सह-कलाकार उपासना खन्नाने ही माहिती शेअर केली आहे.

याआधी बातमी आली होती की लीना आचार्य यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले आहे मात्र आता मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांचे निधन झाल्याची पुष्टी झाली आहे. दिवंगत अभिनेत्रीसोबत व्यतीत केलेले क्षण आठवत, उपासनाने ईटाइम्स टीव्हीला सांगितले की, '2015 मध्ये मला लीना यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी सेठ जी मध्ये माझ्या आईची भूमिका साकारली होती. यामध्ये मी एक महाराष्ट्रीय गणेश रावची भूमिका सकारात होती. मी त्यांना आई ऐवजी माई म्हणायचो. या दरम्यान आमच्या दोघींमध्ये एक खास बंध तयार झाला होता. मुंबईत मी एकटी राहत असल्याने त्या माझ्यासाठी जेवण आणत असत, त्या खूप प्रेमळ व्यक्ती होत्या.’ (हेही वाचा: Asit Kumarr Modi, तारक मेहता का उल्टा चश्मा चे निर्माते COVID 19 पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती)

लीना यांच्या आरोग्याबाबत उपासना म्हणाल्या, '2015 मध्येच मला त्यांच्या समस्येबद्दल माहित झाले होते. या दरम्यान, त्यांना तब्येतीच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागला होता आणि गेल्या 4 महिन्यांत त्यांची तब्येत अधिकच खालावली.’ दरम्यान, लीना यापूर्वी हिचकी, गंदी बात आणि काही वेब सिरीजमध्ये दिसल्या होत्या.