Pawan Singh Passed Away: हिंदी आणि तामिळ मालिकांमधील प्रसिध्द कलाकार पवन याचे निधन, वयाच्या 25 वर्षी घेतला शेवटचा श्वास
छोट्या पडद्यावर पवनने लोकांचे मनोरंजन केले.
Pawan Singh Passed Away: हिंदी आणि तमिळ मालिकांमध्ये प्रसिध्द कलाकार पवन याचे ह्रदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने निधन झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचे 18 ऑगस्ट शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला आहे. लोकप्रिय हिंदी आणि तमिळ टेलिव्हिजन अभिनेता पवन याने काम केले आहे. छोट्या पडद्यावर काम करून त्यांने लोकांचे मनोरंजन केले. पवन सिंहचे 18 ऑगस्टला निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरात त्याचे निधन झाले.
पवनचे पार्थिव देह कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात येईल, जेथे त्याच्या कुटुंबीयांकडून अंतिम संस्कार केले जातील. पवन हा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. हरिहरपुरा गावातील नागराजू आणि सरस्वती यांचा तो मुलगा होता. हिंदी आणि तामिळ मालिकांमध्ये झळकला. हृदयविकाराचा झटका हे कारण वगळता त्यांच्या मृत्यूच्या तपशीलाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.