हिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु

कलर्स (Colors) या हिंदी वाहिनीवरील मालिका 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) यामधील बाल कलाकर शिवलेख सिंह (Shivlekh Singh)याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Shivlekh Singh (Photo Credits-Instagram)

कलर्स (Colors) या हिंदी वाहिनीवरील मालिका 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) यामधील बाल कलाकर शिवलेख सिंह (Shivlekh Singh)याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या काही व्यक्तींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रायपूर येथे जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बिलासपूर येथू रायपूरच्या दिशेने शिवलेख एका मुलाखतीसाठी जात होता. त्यावेळी त्यांच्या कारसमोर ट्रक येत भीषण अपघात झाला. या अपघातावेळी शिवलेख याचे आई-वडिल आणि नवीन सिंह कारमध्ये होते. अपघातामुळे शिवलेख याच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे सांगिते जात आहे. तर दुर्घटना झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांकडून चालकाचा शोध सुरु आहे. (प्रसिद्ध गायक गुलशन कुमार यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री)

तसेच पोलिसांनी शिवलेखचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परंतु या धक्कादायक घटनेमुळे सर्वांना दुख झाले आहे. तर शिवलेखा लवकरच रेमो डिसूजा यांच्या एका चित्रपटातून झळकणार होता.