Burglary At Pushkar Shrotri House: मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात चोरी; सोन्याच्या दागिन्यासह 10 लाखांहून अधिक किमतीची रोकड लंपास, गुन्हा दाखल

प्रांजल श्रोत्री यांनी कपाटातून सोन्याचे दागिने काढले. त्यावेळी त्यांना यात काहीतरी गोंधळ असल्याचं समजलं. श्रोत्री कुटुंबीय सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात गेले. तेव्हा त्यांना हे दागिने बनावट असल्याचे लक्षात आले.

Pushkar Shrotri (PC - Instagram)

Burglary At Pushkar Shrotri House: मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri)च्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अभिनेत्याच्या घरी घरकाम करणाऱ्या नोकराने सोन्याच्या दागिन्यासह 10 लाखांहून अधिक किमतीची रोकड लंपास केला आहे. पुष्करच्या घरातून 10.27 लाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि 1.20 लाखांची रोकड चोरी करण्यात आली आहे. पुष्कर शोत्री यांनी उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे या दोन जणांविरुद्ध फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरनुसार, विलेपार्ले पूर्वेला राहणारा अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्याकडे घरकामासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी तीन हेल्पर होते. त्यापैकी एक, उषा गांगुर्डे (41) यांनी सुमारे 5 ते 6 महिने सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत काम केले. तिने घरातील रोकड लंपास केली. 22 ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजल हिला उषा गांगुर्डे हिच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि तपासादरम्यान तिने पैसे चोरल्याचे कबूल करून पती भानुदास गांगुर्डे याच्याकडे ऐवज दिल्याचं सांगितलं. तिच्या पतीनेही चोरीचे पैसे मिळाल्याची कबुली दिली. (हेही वाचा -अभिनेता Prasad Oak 'धर्मवीर' पार्ट 2 मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणार; दिघे यांच्या वेशभूषेमध्ये टेंभी नाक्यावर घेतलं देवीचं दर्शन, Watch Video)

दुसरी घटना 24 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. प्रांजल श्रोत्री यांनी कपाटातून सोन्याचे दागिने काढले. त्यावेळी त्यांना यात काहीतरी गोंधळ असल्याचं समजलं. श्रोत्री कुटुंबीय सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात गेले. तेव्हा त्यांना हे दागिने बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तपासादरम्यान उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याऐवजी तेच बनावट दागिने आणल्याचे उघड केले.

त्यानंतर पुष्कर श्रोत्री यांनी 26 ऑक्टोबर रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 381, 406 आणि 429 अंतर्गत उषा आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.