Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
हा सर्व प्रकार कलर्स वाहिनीवर प्रसारित झाला होता. त्याच्या निषेधार्थ भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे (Ritu Tawde) यांनी बिचुकलें ना घराबाहेर काढावे या मागणीसाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
'बिग बॉस मराठी 2' (Bigg Boss Marathi 2) च्या घरात अभिजीत बिचुकलें (Abhijit Bichukale) च्या रुपात आलेले राजकीय वादळ आता दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहे. नुकतेच त्यांनी बिग बॉस च्या एका टास्क मध्ये आपली सहस्पर्धक रुपाली भोसलेला (Rupali Bhosale) अगदी अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार कलर्स वाहिनीवर प्रसारित झाला होता. त्याच्या निषेधार्थ भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे (Ritu Tawde) यांनी बिचुकलें ना घराबाहेर काढावे या मागणीसाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
अभिजीत बिचुकले यांनी रुपालीच्या घटस्फोटाचा उल्लेख करत तिच्या चारित्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा आरोप रितू तावडे यांनी केला आहे. तसेच तिच्या वडिलांवरुन व आईवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. बिचुकलेंच्या घटस्फोटित महिलांवर केलेल्या शेरेबाजीमुळे अशा असंख्य महिलांचा अवमान होत आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकलें ची बिग बॉस च्या घरातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
नेमकं काय होतं ते प्रकरण:
बिग बॉस ने दिलेल्या नॉमिनेशन च्या टास्कमध्ये स्पर्धकांना बहूमताने स्वत:ला 1 ते 10 च्या क्रमांकांमध्ये स्थान द्यायचे होते. त्यात रुपालीला बिचुकले उभे असलेला चौथा क्रमांक हवा होता. मात्र बिचकुले हटण्यासाठी तयार नव्हते. म्हणून रुपाली त्यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. आणि अखेर तिने त्यांच्या 4 महिन्यांच्या मुलीचा उल्लेख केला. यावर बिचुकलेंचा राग अनावर होऊन त्यांनी रुपालीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तिच्या चारित्र्याविषयी ही अपशब्द बोलले.
एवढेच करुन बिचुकले थांबले नाही. तर मला हा फालतू खेळ खेळायचा नाही. आणि बिग बॉस ला त्यांची बॅग भरण्यास सांगितले. यावर रुपाली ने बिचुकलें ची माफी देखील मागितली होती. मात्र आता बिग बॉस अभिजीत बिचुकलें ची हकालपट्टी करणार की मुख्यमंत्री स्वत: यात लक्ष घालणार हे लवकरच कळेल.