Bigg Boss Marathi 2 Day 15 Episode Preview: पराग कान्हेरे सुरक्षित मग 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक कोण?

अभिजीत केळकर, नेहा शितोळे, माधव देवचक्के, मैथिली जावकर, वीणा जगताप आणि पराग कान्हेरे हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते.

Bigg Boss Marathi 2 First Elimination (File Photo)

बिग बॉस मराठी 2 मध्ये 15 दिवसांनंतर आज (9 जून) पहिलं एलिमिनेशन होणार आहे. अभिजीत केळकर, नेहा शितोळे, माधव देवचक्के, मैथिली जावकर, वीणा जगताप आणि पराग कान्हेरे हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते. त्यापैकी शनिवारच्या विकेंडच्या डावमध्ये पराग कान्हेरे सुरक्षित असल्याचं होस्ट महेश मांजरेकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता उर्वरित पाच नॉमिनेट झालेल्या कलाकारांपैकी कोण बाहेर पडणार याची उत्सुकता लागली आहे.बिग बॉस मराठी 2 च्या घरात पहा आजपर्यंत काय काय झालं? 

नेहा या आठ्वड्यातील स्टार परफॉर्मर होती. तर वीणा जगताप आणि शिवानी सुर्वेच्या बिग बॉसच्या घरात पहिल्याच लक्झरी बजेट टास्कमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे वीणा चर्चेमध्ये आहे. माधव देवचक्के त्यांच्या 'भाई' अंदाजामुळे बिग बॉस 2 च्या घरात लाईमलाईटखाली आहे. तर अभिजीतही त्याचा खेळ संयमपणे खेळत पुढे येतोय. या स्पर्धकांच्या तुलनेत मैथिली फारशी बिग बॉसच्या घरात अ‍ॅक्टिव्ह नाही. खेळाची संचालक असूनही ती ठोस भूमिका घ्यायला कमी पडल्याचं मत महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता नेमकं आजच्या एपिसोडमधून बाहेर कोण पडणार? याची उत्सुकता वाढली आहे.

'चोर बाजार' खेळादरम्यान घरात झालेली भांडणं, हेवेदावे आणि गटबाजीची आजच्या भागामध्येही घरातल्या सदस्यांची शाळा घेतली जाणार आहे.पण त्यात वातावरण थोडं हलकं करण्यासाठी बिचुकल्यांच्या 'फ्ल्युएंट इंग्रजी'चं कौशल्य पणाला लागणार आहे.

सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले यांच्यामधील इंग्रजी संवाद

बिग बॉसच्या घरात 15 सदस्यांसह 26 मे पासून सुरूवात झाली आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

New Zealand vs England: आपल्या अंतिम कसोटी सामन्यात टीम साऊदीने केला अनोखा विक्रम